कोरोना औषध: होमिओपॅथीने कोरोना बरा होऊ शकतो का? अर्सेनिक अल्बम 30 काय आहे? #सोपीगोष्ट 86

Published

कोरोनाच्या केसेसची संख्या राज्यात आणि देशात वाढत असताना होमिओपॅथीचं एक औषध खूप चर्चेत आलं असेल. त्या औषधाचं नाव आहे 'अर्सेनिक अल्बम.'

या औषधाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. अनेकांना वाटत आहे की हे औषध कोरोनासारख्या आजारावर एक महत्त्वाचं शस्त्र होऊ शकतं.

काही लोक या औषधाला 'मिरॅकल ड्रग' म्हणत आहेत तर काही लोक म्हणत आहेत की होमिओपॅथीचा परिणाम होण्यासाठी वेळ लागतो. तेव्हा कोरोनासारखा आजारावर हे औषध कितपत लागू होईल अशी शंका आहे.

आपण आजच्या सोपी गोष्टमध्ये हेच पाहणार आहोत की अर्सेनिक अल्बम काय आहे? होमिओपॅथीकडे कोरोनाचा उपचार आहे का? होमिओपॅथीबद्दल नेमका वाद काय आहे?

निर्मिती - तुषार कुलकर्णी

सादरीकरण - विनायक गायकवाड

एडिटिंग - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)