कोरोना: डोनाल्ड ट्रंप अजूनही करतायत हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची भलामण
Published
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर तिथल्या आरोग्यविषयक तज्ज्ञांनी आणि डॉक्टरांनी टीका केली आहे. स्वत:ला कोरोनापासून वाचवण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध घेत असल्याचं ट्रंप यांनी जाहीरपणे सांगितलं होतं.
पण, हे औषध कोव्हिड-19पासून बचाव करतं असा कुठलाही पुरावा नसल्याचं अमेरिकेतल्या औषध नियमन मंडळाने जाहीर केलंय. शिवाय या औषधामुळे ह्रदयविकाराचा धोका असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. असं असतानाही ट्रंप यांनी औषधाचं कौतुक करणं सुरूच ठेवलंय. त्यावरूनच अमेरिकेत सध्या मोठी चर्चा सुरू आहे.
बीबीसी प्रतिनिधी निक ब्रायंट यांचा रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)