कोरोना व्हायरसविरोधातील युद्धात उतरले युके लष्करातील शास्त्रज्ञ

Published

युकेमधील लष्कराचे शास्त्रज्ञ कोरोना विरोधातल्या युद्धात पुढे सरसावलेत. आरोग्य सेवा पुरवणाऱ्या लोकांचं कोव्हिड-19 पासून कसं संरक्षण करता येईल हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय आहे. आणि त्या दृष्टीने त्यांचं संशोधन सुरू आहे.

नोव्हिचोक या नर्व्ह एजंटचा शोध लावणारे संशोधक, तसंच पश्चिम आफ्रिकेत पसरलेल्या इबोला रोगाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ या विशेष टीममध्ये आहेत.

युकेमध्ये जिथे हे संशोधन चालतं त्या जागेत जाण्याची परवानगी बीबीसीचे संरक्षणविषयक प्रतिनिधी जोनाथन बिल यांना मिळाली. पाहुया हा खास रिपोर्ट...

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)