आत्मनिर्भर भारत : कोरोना लॉकडाऊनच्या आर्थिक संकटात सोनं भारताला तारू शकेल का? #सोपीगोष्ट 7

व्हीडिओ कॅप्शन, आत्मनिर्भर भारत : कोरोना लॉकडाऊनच्या आर्थिक संकटात सोनं भारताला तारू शकेल का? #सोपीगोष्ट 7
Published

जगासमोरचं कोरोनाचं संकट हे फक्त आरोग्य संकटच नाही तर आर्थिक संकटही आहे. या आरोग्य आणीबाणीनंतर उद्भवणाऱ्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी मोदी सरकारनं नुकतीच २० लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा केलीये.

वेगवेगळ्या घटकांसाठी यातून आर्थिक मदत दिली जातेय. पण भारताच्या जीडीपीच्या १० टक्के असलेल्या आर्थिक पॅकेजसाठी इतका मोठा निधी कुठून उभा राहाणार याबबात अजूनही स्पष्टता नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बोलताना इतकंच सांगितलंय की आर्थिक पॅकेजच्या घोषणा जाहीर करून झाल्यानंतर निधी कुठून उभारला जाईल याबाबतचीही माहिती सरकार देईल. आणि म्हणूनच निधी उभारण्यावरून सरकारला काही सूचना केल्या जातायत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला सुचवलंय की देशातल्या धार्मिक ट्रस्ट्सकडे जमा असलेलं सोनं सरकारने अल्पव्याजावर कर्जाने घ्यावं, आणि त्यातून पैसा उभा करून सध्याच्या आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढावा.

देशातल्या अनेक धार्मिक संस्थांकडे हजारो कोटी रुपयांचं सोनं आहे आणि त्यामुळे या आर्थिक संकटाच्या काळात हा पर्याय असू शकतो का? सोनं, मग ते या धार्मिक ट्रस्ट्सकडे असो किंवा आपल्या घरांमध्ये साठवलेलं, ते आता देशाची आर्थिक घडी बसवण्यात मदत करू शकेल का?

संशोधन - गुलशनकुमार वनकर

निवेदन - विनायक गायकवाड

एडिटिंग - शरद बढे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)