अफगाणिस्तानच्या गारदेझ शहरात आत्मघातकी हल्ला, किमान 5 जण ठार

व्हीडिओ कॅप्शन, अफगाणिस्तानच्या गारदेझ शहरातआत्मघातकी हल्ला, किमान 5 जण ठार
Published

काबूलमध्ये एक रुग्णालय आणि दफनभूमीत मंगळवारी सकाळी एकाचवेळी आत्मघातकी हल्ला झाला. त्यानंतर आता आज सकाळी गारदेझ शहरात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

तर डझनावारी लोक जखमी झाले आहेत. स्फोटकांनी भरलेलं एक वाहन सैनिकी केंद्रात घुसलं. त्यापूर्वी मंगळवारी एक रुग्णालय आणि दफनभूमीवर हल्ला झाला होता. आणि यात किमान 24 लोक मरण पावले. हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये नवजात अर्भकं आणि मातांचाही समावेश होता.

अफगाणिस्तानमध्ये कोरोनाच्या संकटाच्या वेळी हे नेमकं काय सुरू आहे यावरील बीबीसीचा हा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)