कोरोना: 'अठरा वर्षं आणि तीन विशेष पदव्या मिळवूनही आम्ही प्रतिक्षेच्या यादीत अडकलो आहोत.'
Published
अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे सगळेच व्यवहार ठप्प झालेत. याचा फटका ग्रीन कार्ड संदर्भातली प्रक्रिया पाहणाऱ्या विभागालाही बसलाय. तिथली व्यवस्था पाहणारे कर्मचारी आपापल्या घरी आहेत.
त्यात अमेरिकेत कायम वास्तव्य आणि H1 -B व्हिसाच्या कडक नियमांमुळे ग्रीन कार्ड मिळवणं आता स्वप्नच ठरले की काय अशी परिस्थिती उद्भवली आहे. या सगळ्यांमध्ये तिथले भारतीय वंशाचे लोक भरडले जात आहेत. अमेरिकेतल्या या वास्तवाचा आढावा घेतलाय बीबीसीचे प्रतिनिधी विनित खरे यांनी.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)