कोरोनाशी लढण्यासाठी राजकोटच्या उद्योजकाने बनवला 1 लाख रुपयांचा व्हेंटिलेटर

Published

कोव्हिड-19च्या चाचण्यांची किट्स सध्या देशात कमी पडतायत. तसंच रुग्णांसाठीच्या व्हेंटिलेटर्सचाही तुटवडा आहे.

पण, गुजरातच्या राजकोटमधील एका उद्योजकाने आपल्या टीमच्या मदतीने हवेच्या दाबावर चालणारा एक व्हेंटिलेटर तयार केला आहे. आणि त्याच्या पेटंटसाठीही अर्ज केला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा व्हेंटिलेटर हे उद्योजक एक लाख रुपयांमध्ये उपलब्ध करून देणार आहेत.

त्यासाठी गुजरात सरकारशी त्यांनी संपर्कही साधला आहे. इतर राज्यातून या व्हेंटिलेटरला मागणी असल्याचाही दावा उद्योजक पराक्रम सिंह जाडेजा यांनी केला आहे. बघूया हा व्हेंटिलेटर कसा चालतो?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)