'कोरोना पसरल्याच्या दोन आठवड्यांतच युकेमध्ये रक्तातील प्लास्माचा वापर करायला हवा होता.'

व्हीडिओ कॅप्शन, 'कोरोना आल्याच्या दोन आठवड्यांतच युकेमध्ये रक्तातील प्लास्माचा वापर करायला हवा होता.'
Published

युकेमध्ये पहिल्यांदाच प्लास्मा थेरपीचा वापर प्रयोग म्हणून करण्यात येणार आहे. या उपचारात कोव्हिड-19 मधून बऱ्या झालेल्या रुग्णाचं रक्त घेतलं जातं.

प्लास्मा देण्याऱ्याच्या अँटीबॉडीज आजारी माणसाला यातून बरं करण्यास मदत करतील उपचारामागचा हेतू आहे.

अमेरिकेत पहिल्या तीन आठवड्यांनंतरच देश पातळीवरचा प्रकल्प हाती घेण्यात आला. ज्यात 1500 हॉस्पिटल्सचा समावेश होता आणि 600 रुग्णांवर प्लास्मा देऊन उपचार करण्यात आले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)