कोरोना व्हायरस मुंबई शहरात का पसरतोय? - सोपी गोष्ट

Published

मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काही गोष्टी लख्खपणे उभे राहतात. जसं की गेट वे ऑफ इंडिया, शिवाजी पार्क, वानखेडे स्टेडिअम, मुंबईची लाइफ लाइन म्हटली जाणारी लोकल. पण मुंबई म्हटलं की आणखी एक गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे धारावी.

धारावी हा दाटीवाटीचा भाग आहे. हजारो झोपड्या आणि या झोपड्यांमध्ये राहणारे लाखो श्रमिक लोक. जगातल्या सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेल्या भागांपैकी हा एक भाग आहे.

आणि या भागात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

आजच्या सोपी गोष्टमध्ये आपण हेच पाहणार आहोत की मुंबईमध्ये इतके रुग्ण का आढळले, मुंबई का बनली कोरोनाचा हॉटस्पॉट, धारावीत सापडलेल्या रुग्णांमुळे इतरांना किती प्रमाणात धोका आहे, जर तिथे कोरोनाचा प्रसार झाला तर आपल्याकडे पुरेशा सोयी-सुविधा आहेत का?

व्हीडिओ - विनायक गायकवाड

निर्मिती - तुषार कुलकर्णी

एडिटिंग - शरद बढे

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)