भारताकडे पुरेसे व्हेंटिलेटर्स आहेत का? - सोपी गोष्ट
देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 1649 इतकी झाली आहे. आतापर्यंत 143 जण बरे झाले आहेत तर मृतांचा आकडा 41 वर गेला आहे.
रुग्णांना बरं करण्यात व्हेंटिलेटर्सचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे.
व्हेंटिलेटरचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर श्वास घेण्यासाठी मदत करणारं उपकरण.
जेव्हा फुफ्फुसांना काही संसर्ग होतो त्यामुळे पेशंटला श्वास घेता येत नाही, तेव्हा त्या व्यक्तीला व्हेंटिलेटर लावलं जातं. म्हणजेच त्या व्यक्तीचं श्वास घेण्याचं काम व्हेंटिलेटर सोपं करतं.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) सांगते की कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर 80 टक्के पेशंट हॉस्पिटल ट्रीटमेंटशिवाय बरे होतात.
पण सहा जणांमधून एका पेशंटला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
व्हीडिओ - विनायक गायकवाड
निर्मिती - तुषार कुलकर्णी
एडिटिंग - शरद बढे
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)