तुम्ही बुडणारी राजधानी पाहिली आहे का?- पाहा व्हीडिओ
Published
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे जगातलं सर्वाधिक वेगानं बुडणारं शहर आहे. जावा समुद्राची पातळी वाढत चालल्यानं जकार्ताचा किनारा मागे हटत चालला आहे.
समुद्राला थोपवण्यासाठी याठिकाणी एक भिंत बांधण्यात आली आहे. जवळपास 100 मीटर लांबीची ही भिंत आहे. ही भिंतच आता या शहराची ओळख बनली आहे.
तिथं दिसणारी मशीद कित्येक वर्षांपूर्वीच पाण्याखाली गेली आहे. इथं भविष्यात गंभीर परिस्थिती ओढावणार आहे.
त्यामुळेच देशाची राजधानी इथून 2 हजार किलोमीटर दूर नेण्यात येणार आहे. आता बोर्निओ बेटावर इंडोनेशियाची नवी राजधानी वसवण्यात येणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)