'क्लाऊड सीडिंग'मुळे पूर रोखता येऊ शकतो का?

Published

इंडोनेशियात अनेक टन मीठ आकाशात सोडलं जातंय. पूर रोखण्यासाठी इंडोनेशियात असा प्रयोग केला जातोय.

वादळी ढगांमध्ये मीठ सोडलं जातं. मीठाचे कण ढगातली आर्द्रता आकर्षित करतात. त्यातून पावसाचे थेंब तयार होतात. हे थेंब एकत्र होऊन मग पाऊस पडतो.

जर या वादळी ढगांनी सर्व पाणी समुद्राबाहेरील भागात पाडलं, तर लोक राहत असलेल्या भागात पूर येण्याची शक्यता कमी होईल. त्यामुळं असाच प्रयोग इंडिनेशियन प्रशासन करतोय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)