विनेश फोगट : BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन

Published

"खेळताना तुम्ही जायबंदी झालात, तर तुमचं करिअर संपलेलं असतं, " विनेशला रिओ ऑलिम्पिकमधली ती मॅच आठवते ज्यात दुखापत झाल्याने तिचं पदक हुकलं होतं.

"तेव्हा वाटलं सगळं संपलं, पण आता मला दुसऱ्यांदा संधी मिळतेय, माझं स्वप्न साकार करण्याची," त्या चेहऱ्यावर निग्रह दिसतो.

"आधी लोक टोमणे मारायचे, मुलींना काय करायला लावताय विचारायचे. पण आज स्वतःहून मुलींना कुस्तीमध्ये उतरवतायत.

आमच्या गावात आता मुलगी जन्मली तर लोक म्हणतात टेन्शन नको, तिला पैलवान बनवू. नुस्तं म्हणत नाहीत, पैलवान करतातही."

तुमच्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी इथे क्लीक करा.

( रिपोर्टर आणि निर्माती - वंदना, व्हीडिओ - नेहा शर्मा, एडिटिंग - प्रेम बूमिनाथबन)

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)