CAA-NRC: विरोध आंदोलन पोहोचलं युरोप आणि अमेरिकेत - व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, युरोपियन युनियनच्या संसदेत भारताच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविषयी चर्चा होणार आहे.
Published

पश्चिम बंगाल विधानसभेने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात प्रस्ताव मंजूर केल्यानंतर केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जाणारं पश्चिम बंगाल हे चौथं राज्य बनलंय.

CAAला असलेला विरोध युरोपियन युनियनच्या संसदेत पोहोचलाय. CAA विरोधात शनिवारी मांडण्यात आलेल्या ठरावावर चर्चा 29 जानेवारीला होणार आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून केरळमध्ये 680 किलोमीटर लांबीच्या मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर अमेरिकेतही काही ठिकाणी CAAच्या विरोधात आणि समर्थनार्थ निदर्शनं झाली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)