काश्मीरमध्ये लोकांना 2G इंटरनेट उपलब्ध करून दिल्याने लोकांच्या अडचणी संपल्या आहेत का?
Published
जम्मू काश्मीरमध्ये 15 जानेवारीला टप्प्या टप्प्यात इंटरनेट सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हॉस्पिटल्स, बँका, शैक्षणिक संस्था, यांसारख्या अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या संस्थापुरतीच ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. तर काही जिल्ह्यातल्या लोकांसाठी फक्त 2G इंटरनेट उपलब्ध करून दिलं गेलं.
पण 120हून अधिक दिवसांनंतर थोडंथोडकं का होईना, इंटरनेट सुरू झाल्याने अत्यावश्यक सुविधांचा लाभ लोकांना घेता येतोय का?
याविषयी बांदिपोरा जिल्ह्यातल्या लोकांशी बीबीसीचे प्रतिनिधी आमिर पीरझादा यांनी 21 जानेवारी रोजी केलेली ही बातचीत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)