Sex trafficking: देहविक्रीसाठी भारतात अफ्रिकन तरुणींची तस्करी – BBC Africa Eye

Published

आफ्रिकन महिलांची भारतात देहविक्रीसाठी तस्करी करणाऱ्या एका अवैध नेटवर्कचा बीबीसी Africa Eyeच्या टीमने पर्दाफाश केला आहे.

नोकरीचं आमिष दाखवून या महिलांना आधी या नेटवर्कमध्ये अडकवलं जातं आणि त्यानंतर त्यांचे पासपोर्ट हिसकावून घेतले जातात.

नंतर त्यांना शरीरविक्रीच्या धंद्यात ढकललं जातं, विशेषतः राजधानी दिल्लीत राहणाऱ्या अनेक आफ्रिकन पुरुषांसाठी.

यापैकी बहुतांश महिला केनिया, युगांडा, नायजेरिया, तांझानिया आणि रवांडामधून आल्या आहेत.

ग्रेस त्यांच्यापैकीच एक. तिला फसवून केनियाहून इथे तिची तस्करी करण्यात आली होती. बीबीसी आफ्रिका आयच्या तपासासाठी तिने अंडरकव्हर जाण्याचं धाडस दाखवलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)