चंद्रकांत पाटील यांनी दत्तक घेतलेलं कसबा वाळवे गाव किती आदर्श? - पाहा व्हीडिओ

Published

राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे हे गाव 'आमदार आदर्श ग्राम योजने'अंतर्गत दत्तक घेतलं आहे.

"चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निधीतून गावातील मुख्य रस्त्यांचं काम झालं, पण अंतर्गत रस्ते अजूनही खराब अवस्थेत आहे," असं या गावातले नागरिक कृष्णात देसाई सांगत होते.

गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधांचा अभाव असल्याचं सुनिता पाटील यांनी सांगितलं.

रिपोर्ट आणि शूट - स्वाती पाटील

एडिट - निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)