पाकिस्तान: हिंदू मंदिराची जमावाने केली तोडफोड - पाहा व्हीडिओ
Published
पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतात संतप्त जमावाने हिंदूंच्या एका मंदिराची तोडफोड केली.
याबरोबरच इतर हिंदू मालमत्तेचंही नुकसान केलं. एका हिंदू शिक्षकावर त्यांच्या विद्यार्थ्याने प्रेषित पैगंबरांचा अपमान म्हणजेच 'ईशनिंदा' केल्याचा आरोप ठेवला. यानंतर या जमावाने त्या शाळेची तसंच मंदिराची नासधूस केली.
आरोपी शिक्षक नुतन तसंच हिंसा करणाऱ्या जमावावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)