You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'NRC यादीसाठी लोकांना मदत केली आणि स्वतःचंच नाव यादीत आलं नाही'
एनआरसी म्हणजे आसाममध्ये पिढ्यान पिढ्या वास्तव्य असलेल्या अधिकृत मूळनिवासी लोकांची यादी. ही यादी नुकतीच जाहीर झाली आहे.
आणि यात 19 लाख लोकांना स्थान मिळालेलं नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीय. नव्या NRC यादीनंतर ते भारताचे नागरिक नाहीत, असा अर्थ होतो.
त्यामुळेच या लोकांची राज्यात निदर्शनं सुरू आहेत. एनआरसी म्हणजे काय तर आसाममध्ये 1986 नंतर मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर आले.
त्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मग आसामचे अधिकृत निवासी कोण हे ठरवण्यासाठी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सची यादी तयार करण्याचं संसदेत ठरलं.
आसाममध्ये एका मोठ्या जनआंदोलनानंतर 1986मध्ये केंद्रसरकारने सुधारित NRC बनवण्याचा निर्णय घेतला. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली हे काम 31 ऑगस्ट 2019ला पूर्ण झालं
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)