काश्मीर: गिलगिट बाल्टिस्तानमधल्या लोकांचं दुहेरी दुःख, विभागली कुटुंबं, आता जमिनी जाण्याची चिंता

Published

स्कर्दू हे गाव नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ, पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टिस्तानमध्ये आहे. काश्मीरची राजधानी श्रीनगर.

तिथून पूर्वेकडे नियंत्रण रेषेजवळ गेलात की येतं कारगिल आणि त्यापलीकडे, पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टिस्तानात आहे स्कर्दू.

भारताने कलम 370 आणि 35 A रद्द केल्यानंतर जशी जम्मू-काश्मीरमध्ये प्रतिक्रिया उमटली तशीच ती या गावातही उमटली.

या गावात अशी अनेक कुटुंब राहतात जी 71 च्या युद्धादरम्यान विभागली गेली. ही कलमं रद्द केल्यानंतर आता या लोकांना भीती आहे की त्यांची लडाखमधली कौटुंबिक मालमत्ता धोक्यात येणार आहे.

पण खुद्द गिलगिट बाल्टिस्तानातल्या काही कार्यकर्त्यांनी याकडे लक्ष वेधलंय की पाकिस्तानने साधारण 40 वर्षांपूर्वीच 35A सारखंच संरक्षण गिलगिट बाल्टिस्तानच्या लोकांना देणारा एक कायदा, जो तेव्हा अस्तित्वात होता तो रद्द केला.

शुमाईला जाफरी यांचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)