काश्मीर: पाकिस्तान प्रशासित काश्मिरमध्ये कलम 370 रद्द झाल्यानंतर 'आझादी'च्या घोषणा

Published

भारत आणि पाकिस्तान दोघांनीही काश्मिरातून निघून जावं म्हणून 26 तारखेला पाकिस्तान प्रशासित काश्मिरात जोरदार निदर्शनं झाली.

निदर्शकांमध्ये मोठ्या प्रमाणाप पुरुष, महिला आणि बालकांनी सहभाग घेतला होता. यावेळेस पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात घोषणाही दिल्या गेल्या.

पाकिस्तानातल्या मिरपूर आणि रावळपिंडी या शहरांमध्येही आंदोलनं झाली. पाकिस्तान प्रशासित काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान यांचं एक विधिमंडळ असावं आणि त्याला पूर्ण स्वातंत्र्य असावं, अशी मागणी त्यांनी केली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)