काश्मीरमधलं भारतातलं कव्हरेज निराशाजनक - एन राम - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, काश्मीरमधलं भारतातलं कव्हरेज निराशाजनक - एन राम - पाहा व्हीडिओ
Published

काश्मीरमधलं कलम ३७० हटवल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचं भारतातलं कव्हरेज निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया द हिंदू ग्रुप चे अध्यक्ष आणि माजी संपादक एन. राम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त एन राम मंगळवारी पुण्यात आले होते. पहिल्या दाभोळकर स्मृती व्याख्यानादरम्यान बोलताना त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरही भाष्य केली.

बीबीसी मराठीच्या जान्हवी मुळे यांनी एन राम यांच्याशी बातचीत केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)