काश्मीरमध्ये कलम 370 च्या विरोधात जोरदार निदर्शनं
Published
काश्मीरमध्ये जम्मूतील पूंछ, राजौरी, डोडा आणि किश्तवाड प्रदेशात सलग सहा दिवस जमावबंदी लागू आहे. या सगळ्या ठिकाणी कर्फ्यूसारखं वातावरण आहे.
ईद सणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जमावबंदीच्या नियमातून सूट देण्यात येईल असं सरकारनं जाहीर केलं होतं. मात्र ज्या ठिकाणी आंदोलनं-प्रदर्शनं सुरू आहेत त्याठिकाणी नाकाबंदी कठोर प्रमाणात लागू आहे.
सुरक्षादलांनी बळाचा वापर केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यात अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. सरकारनं हे वृत्त फेटाळलं आहे.
हे पाहिलं का ?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)