हाँगकाँग: चीनविरोधातल्या लोकशाही आंदोलना दरम्यान संसदभवनावर हल्ला करणाऱ्या काही आंदोलनकर्त्यांच्या तेव्हाच्या भावना
हाँगकाँगमध्ये लोकशाहीवादी आंदोलन सुरू झाल्यापासून मागच्या दोन महिन्यात दीडशेच्या वर आंदोलनकर्त्यांना अटक झाली आहे.
प्रत्यर्पण कायदा पूर्णपणे रद्द व्हावा, देशात संपूर्ण लोकशाही असावी आणि आंदोलनादरम्यान अटक झालेल्या लोकांना अभय मिळावं, अशी लोकांची मागणी आहे.
बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजे 1 जुलैला आंदोलनकर्त्यांनी हाँगकाँगच्या संसदेवर हल्ला केला होता. हल्लेखोरांवरचा गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना 1 ते 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
या आंदोलनात सहभागी झालेल्या काही लोकांशी बीबीसीने संवाद साधला. संसदेवरच्या आंदोलनात उतरताना त्यांच्या मनात नेमक्या काय भावना होत्या, त्यांच्याकडून आम्ही जाणून घेतलं.
अर्थात, त्यांची नावं गुप्त ठेवण्यात आलीत. आणि काही ठिकाणी त्यांचा मूळ आवाजही सुरक्षेच्या आणि गुप्ततेच्या कारणावरून बदलण्यात आलाय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)