वायू प्रदुषणामुळे मेंदूच्या पेशींमधला संपर्क तुटू शकतो

व्हीडिओ कॅप्शन, वायू प्रदुषणामुळे मेंदूच्या पेशींमधला संपर्क तुटू शकतो
Published

धुरामुळं हवेत नायट्रोजन डायऑक्साइड आणि इतर कण साचतात. त्यापैकी मोठे कण नाकात अडकतात. पण सूक्ष्म कण नसांमार्गे मेंदूत पोहोचू शकतात.

त्यापैकी PM 2.5 हा सर्वांत धोकादायक घटक आहे. याचे कण आकाराने वाळूच्या कणापेक्षा 20 पटींनी लहान असतात.

ते इतके लहान असतात की फुप्फुसातच नव्हे तर रक्तप्रवाहातही मिसळतात. मोठे कण असतील तर ते नाकात अडकतात. पण सूक्ष्म कण असतील तर ते नसांमार्गे मेंदूत पोहोचू शकतात.

त्यामुळे मेंदूच्या पेशींमधला संपर्क तुटू शकतो. तज्ज्ञांनुसार यामुळे स्मृतिभ्रंश किंवा आयुष्य कमी होण्याचा धोका असतो.

तसंच हृदयविकार आणि दमासारखे रोगही यामुळे होऊ शकतात. यामुळे मुलांच्या फुप्फुसाची वाढही खुंटण्याची चिन्हं समोर येत आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)