You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
3000 वर्षांपूर्वीच्या मानवाचा मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास असावा?
हजारो वर्षापूर्वीचे मानवी सांगाडे आणि त्यांची संपूर्ण माहिती इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातच बघायला मिळते. त्यातही ३००० वर्षापूर्वीचे मानवी अवशेष सापडणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
मात्र नागपूरपासून २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वन विकास महामंडळाच्या गोरेवाडा प्रकल्पातल्या जंगलात अशा प्रकारचे मानवी अवशेष आणि त्यांची संस्कृती दाखवणाऱ्या अनेक वस्तू सपाडल्या आहेत.
"संशोधकांचा अंदाज आहे की ३ हजार वर्षांपूर्वीच्या या मानवांचा आणि त्यांच्या जमातीचा 'मृत्यू नंतरचं जीवन' या संकल्पनेवर कदाचित विश्वास असावा. म्हणूनच कबरीमध्ये त्या मानवी शरीरासोबतच आवश्यक आणि आवडीच्या वस्तू ठेवल्याचं दिसतं," असं संशोधक कांती पवार सांगतात.
रिपोर्टिंग: सुरभी शिरपूरकर
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)