मनिलामधली जीवावर बेतणारी ढकल गाडी, जी जाते रेल्वे रुळावरून

Published

फिलिपीन्सची राजधानी मनिलामध्ये रेल्वे रूळावरून ढकलगाडीमधून प्रवाशांची ने-आण करण्याचा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे.

हे काम जीवावर बेतणारं आणि अनधिकृत असलं तरी इथले बेघर पोटासाठी हे काम करतात. गेल्या वर्षी अशा प्रवासात नऊ जणांना प्राण गमवावे लागले होते.

मात्र तरीही रोजच्या उत्पन्नासाठी हा धोका सर्रास पत्करला जातोय. मनिला रेल्वे सेवा विभाग या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)