कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न खरंच संपतील का? - व्हीडिओ

Published

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा राजकीय मुद्दा झाल्याचं दिसतंय. पण खरंच कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? काय म्हणत आहेत पंजाबमधील शेतकरी?

काँग्रेस आणि भाजपमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. आतातर आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांचे प्रश्न हा कळीचा मुद्दा असणार आहे. आणि त्यात कर्जमाफीवरून केली जाणारी आश्वासनं चर्चेचा विषय ठरतील.

कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या घरात सुख नांदेल का, याविषयी शेतीतज्ज्ञांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रत्यक्षात कर्जमाफी झाल्यावर काय होतं? पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)