व्हीडिओ : भारतात थैमान घालणाऱ्या झिका व्हायरसविषयी जाणून घ्या
Published
झिका व्हायरस एडिस या डासाद्वारे पसरतो. याच डासापासून डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखे आजार होतात.
युगांडातील झिका या जंगलाचं नाव याला देण्यात आलंय. युगांडात बंदरांवर 1947मध्ये हे प्रथम डास आढळले होते.
1952मध्ये माणसांमध्ये हा व्हायरस आढळला. यात ताप येतो, डोळे लाल होतात आणि सांधेदुखी, डोकेदुखी आणि लाल चट्टे अशी लक्षणं दिसतात. ही लक्षणं 2 ते 7 दिवस राहतात.
हा आजार माणसाकडून माणसाला किंवा प्राण्यांकडून माणसाला होऊ शकतो. गर्भवती आईकडून गर्भातील बाळाकडे हा आजार संक्रमित होऊ शकतो. आणि आजवर यावर कुठलाही उपचार शोधता आला नाहीये.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)