You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कराचीतले हिंदू असा साजरा करतात मोहर्रम - पाहा व्हीडिओ
Published
पाकिस्तानातला मिठ्ठी जिल्हा हिंदूबहुल आहे. या जिल्ह्यातल्या मुसलमान नागरिकांसोबत इथले हिंदू नागरिकही मोहर्रम हा सण साजरा करतात.
इथे राहणारे मोहन लाल मोहर्रमच्या दिवशी होणाऱ्या मातमच्या काफिल्यात सहभागी होतात. तसंच ते मातमसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जेवणाची तयारीही सकाळपासून करतात. इथले मुस्लीम लोक देखील हिंदूना आपलं समजतात. ते देखील हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी होतात.
पाकिस्तानहून बीबीसी प्रतिनिधी शुमाइला जाफरी यांचा रिपोर्ट.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)