You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्हीडिओ : सीरियामधले ब्रिटिश जिहादी हा प्रदेश सोडून जातील का?
सिरियातल्या इडलिबमध्ये परदेशातल्या सैनिकांसह दहा हजारांपेक्षा जास्त कट्टरतावादी अजूनही असाद यांच्या राजवटीविरुद्ध लढत आहेत. यात काही ब्रिटिश जिहादी देखील आहेत.
त्यामुळे इडलिबमध्ये युद्ध टाळणं हे या कट्टरतावाद्यांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून आहे. हा प्रदेशातला रक्तपात थांबवण्यासाठी इथे निर्लष्करी भाग तयार करण्यात आला आहे.
रशियाच्या मते दहशतवादी असलेल्या या कट्टरतावाद्यांना हा प्रदेश सोडून जाण्यासाठी पुढील महिन्याच्या मध्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पण ते इडलिब सोडून जातील का हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
अनेक वर्षं सिरियात राहिलेल्या आणि लढलेल्या कट्टरतावादी ब्रिटिश तुकडीशी बीबीसीने केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत.
टर्की आणि सिरिया यांच्या सीमेवरून बीबीसीचे मिडल ईस्ट कॉरस्पाँडंट क्विंटन सॉमरव्हिल यांनी पाठवलेला हा रिपोर्ट.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)