सीमेपलिकडचा दहशतवाद सहन करण्याचा काळ आता संपलाय - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

फोटो स्रोत, ANI
अनेक वर्षं भारताने सीमेपलीकडील दहशतवाद सहन केला. पण आता तो काळ संपला आहे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
राजस्थानमधील बिकानेर येथे बोलताना जयशंकर म्हणाले, "यापूर्वी नागरिकांच्या मनात सुरक्षेचा प्रश्न सतत राहायचा. भारताने अनेक वर्षं सीमेपलीकडून होणारा दहशतवाद सहन केला. पण आता तो काळ निघून गेला आहे.
26/11 ला मुंबईत जे घडलं ते मोदींनंतर या देशात पुन्हा होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
एस जयशंकर पुढे म्हणाले,आजच्या भारतात कोणतीही दहशतवादी घटना घडली तर सरकारचे उत्तर हे उरी, बालाकोट सारख्या स्टाईकने होतं.
याशिवाय उत्तरेकडील सीमेवरही काही घडले तर त्याला तोंड देण्यासाठी आपले सैन्य उभे असते.







