उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे आमनेसामने, वाचा दोन्ही दसरा मेळाव्यांतील सर्व घडामोडी
मुंबईत उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे तर एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात आज आयोजित करण्यात आला होता.
लाईव्ह कव्हरेज
तेजस ठाकरे : वन्यप्रेमी की ठाकरे कुटुंबातला पुढचा राजकारणी?
एकनाथ शिंदेंनी वि. उद्धव ठाकरे- दसरा मेळाव्यात कुणी कुणावर केली मात
दसरा मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी बीबीसी मराठीच्या वेबसाईटला भेट द्या..
नमस्कार,
आज दिवसभर आपण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यांतील सर्व घडामोडींची माहिती बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजच्या माध्यमातून घेतली.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर झाला.
या दोन्ही मेळाव्यांची आता सांगता झाली आहे. आता आम्ही हे लाईव्ह पेज बंद करणार आहोत. या पेजवर खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला दिवसभर घडलेल्या सर्व घडामोडींची माहिती घेता येईल.
दसरा मेळावा आणि त्याच्याशी संबंधित इतर सर्व बातम्यांसाठी भेट देत राहा बीबीसी मराठीच्या वेबसाईटला. आम्ही युट्यूब, फेसबुक, ट्विटवर आणि इन्स्टाग्रॅम सर्वच ठिकाणी आहोत. आमच्या चॅनेल-पेजला लाईक, फॉलो आणि नक्की सबस्क्राईब करा, धन्यवाद.
एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे : -

- आमच्या भूमिकेला जनसामान्याचा पाठिंबा आहे. त्यामुळेच या ठिकाणी इतकी गर्दी जमा झाली आहे.
- खरी शिवसेना कुणाची याचं उत्तर या जनसागराने दिलं आहे.
- हजारो शिवसैनिकांनी मिळून जो पक्ष उभारला तो आपल्या हव्यासासाठी गहाण टाकलात.
- तुम्ही राष्ट्रवादीच्या तालावर नाचलात. ज्या पक्षाचा उल्लेख बाळासाहेबांनी स्काउंड्रल्स असा केला होता त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली.
- गेल्या तीन महिन्यांपासून मी लोकांमध्ये फिरतोय, सर्व ठिकाणी लहान थोर लोक आमच्या स्वागतासाठी उभे आहेत.
- ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची आहे ना एकनाथ शिंदेंची नाही, तर ही शिवसेना केवळ शिवसैनिकांची आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चालणाऱ्या लोकांची ही शिवसेना आहे.
- ही गद्दारी नाही गदर आहे, गदर म्हणजे क्रांती.
- तुम्ही म्हणतात बाप चोरणारी टोळी आली आहे, पण आम्ही असं म्हणावं का तुम्ही बापाचे विचार विकण्याचा प्रयत्न केला
- तुम्ही जे पाप केलं त्यासाठी तुम्ही बाळासाहेबांच्या समाधीवर माफी मागावी.
- दहशतवादी याकुब मेननची फाशी रद्द करण्याची मागणी करणाऱ्या लोकांना यांनी मंत्रिपद दिलं ही गद्दारी नाही का?
- जेव्हा 2019 मध्ये तुम्ही जनादेश डावलून काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी तुम्ही राजीनामे दिले का?
- तुम्ही अडीच तास देखील मंत्रालयात गेला नाहीत, लोक तुम्हाला कंटाळले होते.
- आज हिंदुस्तानात पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात आहेत पण तुम्ही त्यावर एक चकार शब्द देखील बोलत नाहीत.
- तुम्ही पीएफआयवर एकही शब्द बोलला नाही. अशा संघटनांचा बिमोड केला जाईल ही आमची भूमिका आहे.
- पीएफआयवर बंदी घातल्यानंतर आरएसएस वर बंदी घालावी अशी हास्यास्पद भूमिका घेतली आहे.
- ही कोणत्या राष्ट्रवादी नेत्याची भूमिका आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
- देशाच्या उभारणीत आरएसएसचे मोठे योगदान आहे. प्रत्येक आपत्तीत त्यांनी लोकांची सेवा केली आहे हे आपण पाहिलं आहे.
- तुम्ही आमची नाही तुमची काळजी करा. काँग्रेस, राष्ट्रवादी तुम्हाला आज मित्र वाटतायत. बाळासाहेब त्यांच्यावर टीका करायचे
- माझ्यात आणि तुमच्यात काय ठरलं होतं हे आज मी सांगत नाही. योग्यवेळी सांगेन
- सावरकरांचा अवमान सहन करणार नाही असं म्हणण्याची हिंमत का केला नाही?
- बाळासाहेबांचं स्वप्न मोदी-शहांनी पूर्ण केलं.
- इकडे अध्यक्ष आहे पण पक्ष नाही. काँग्रेसकडे पक्ष आहे पण अध्यक्ष मिळत नाही
- फक्त सोन्याचा चमचा घेऊन येणारे का बनणार मुख्यमंत्री ?
- तुमचं वर्क फ्रॉम होम, आमचं वर्क विदाऊट होम
- तुम्ही बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार असाल, पण आम्ही विचारांचे वारसदार आहोत.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे : -

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे : -
- असा मेळावा फार क्वचित झाला आहे. ही आलेली गर्दी कोरडी नाही. मी किती बोलू शकेन माहिती नाही.
- डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिली नाही, पण मी तुमच्यासमोर नतमस्तक झालो.
- गद्दारांची मंत्रिपद काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का कायम राहील.
- इथं एकही माणून भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही.
- यावेळेचा रावण वेगळा आहे. आतापर्यंत 10 तोंडाचा होता. आता 50 खोक्यांचा खोकासूर, धोकसूर झाला आहे.
- मी दवाखान्यात असताना कटप्पाने माझा घात केला.
- शिंदे गटाला माझ्या तेजाचा शाप आहे.
- भाजपला धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली.
- मी शिवसेना पक्षप्रमुखपदी राहायचं की नाही हे शिवसैनिक ठरवणार.
- मी आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो, भाजप बरोबर अडीच वर्षांचा करार झाला होता.
- इतरांना बाजूला सारून याला (एकनाथ शिंदे) आमदार केला. मंत्री केला. आता हा मुख्यमंत्री झाला तर आता शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं आहे. आहे का लायकी? तुम्ही स्वीकारणार का त्यांना पक्षप्रमुख म्हणून?
- देवेंद्र फडणवीस चांगला माणूस आहे. त्यांना कायदा चांगला कळतो. पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणाले. पुन्हा आले आणि दीड दिवसांत विसर्जन झालं. परत उपमुख्यमंत्री म्हणून आले. कायद्याच्या चौकटीत बोला. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची?
- देवेंद्र फडणवीस कायदा तुम्हालाच कळतो असं नाही आम्हालाही कळतो.
- जर असा कायदा असेल तर आम्ही तो जाळून टाकू. तुमचा कायदा तुमच्या मांडीवर तुम्ही कुरवाळत बसा.
- पाकिस्तानमध्ये जिन्नांच्या थडग्यावर जाऊन नतमस्तक होणारे तुमचे नेते आहेत.
- भाजपकडून तर मला हिंदूत्व शिकायची गरजच नाही. पाकिस्तानमध्ये नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता केक खाणारा तुमचा नेता तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार?
- गायीवर बोलण्यापेक्षा महागाईवर बोला. आरएसएसचे होसबाळे यांचे मी जाहीर अभिनंदन करतो. वाढती महागाई, बेकारी यावर त्यांनी आरसा दाखवला आहे. मोदी जेव्हा 5G च्या कार्यक्रमात कौतुक करत होते. तेव्हा होसबाळे त्यांना आरसा दाखवला.
- सर्व हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपिठावर यावं. मी माझं हिंदुत्व सांगतो, त्यांनी त्यांचं सांगावं.
- ही बाप चोरणारी औलाद आहे. स्वतः च्या बापाला काय वाटत असेल की त्यांच्याऐवजी दुसर्याचं नाव वापरतात. स्वतःच्या बापाच्या नावावर मतं मागा.
- तिकडे खूप ग्लिसरीनच्या बाटल्या गेल्या आहेत. सगळ देऊनही रडगाणं...
- अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री आहेत? या राज्यामध्ये जा, त्या राज्यामध्ये जा... इकडे काड्या घाला, तिकडचं सरकार पाडा... पाकव्याप्त काश्मीरची एक इंच जमिन घेऊन दाखवा. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. कशाला पाहीजेत गद्दार...
- अमित शहा आम्हाला जमीन दाखवा, पण ती पाकव्यप्त काश्मीरमधली दाखवा.
- मिंधे सरकार झुकलेलं आहे. पुष्पा पिक्चर आला होता ना... झुकेगा नही साला... तसं यांचं उलटं आहे. उठेगा नही साला.... यांच्या सरकारला 100 दिवस पूर्ण होतायेत. त्यातले 90 दिवस दिल्लीत गेले असतील. दिल्लीत मुजरा गल्लीत गोंधळ.
- देश हुकुमशाहीच्या दिशेने चालला आहेत. मोहन भागवत मधल्या काळात मशीदीत गेले होते. कशाला गेले होते? हिंदुत्व सोडलं? ते गेले तर त्यांचं राष्ट्रकार्य आणि आम्ही कॉंग्रेससोबत गेलो तर हिंदूत्व सोडलं?
- भाजपचं स्क्रिप्ट न घेता शिंदेंनी भाषण करून दाखवावं.
- पाच वर्षांत हे अशोक चव्हाणांना जाऊन कसे भेटले होते याचा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला आहेच.
- काँग्रेस- राष्ट्रवादीला बरोबर घेऊन आम्ही हिंदुत्व वाढवलं.
- जर तुम्ही साथ दिली तर मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.
- माझा तर असा विचार होता, या सभेला येण्याऐवजी तिकडे जाऊन नव्या हिंदुत्वाचे विचार ऐकून यायचे. आमच्याकडे हिंदुत्व जागृत करून मिळेल अशी पाटी लागली का बघायला पाहीजे. कार्यालय ईडी...
- पूर्वी एक नाटक होत 'तो मी नव्हेच...! हे उलटे आहेत तो मीच... हे तोतय्ये जे जातायेत ते म्हणतायेत मीच बाळासाहेब ठाकरे... या तोतय्यांना आपली शिवसेना पळवायची आहे. तुम्ही घेऊ देणार आपली शिवसेना?
- मी कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं. उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं. कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन मी हिंदुत्व वाढवलं.
- माझ्यासोबत निखाऱ्यांवर चालण्याची तयारी आहे का तुमची? तुम्ही मला साथ आणि वचन द्या. मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.
- एक बरं झालं बांडगूळं छाटली गेली. वृक्षाची मुळं जमिनीत असतात.
देवेंद्र फडणवीस आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची हे नाही चालणार - उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे भाषण LIVE : BKC मैदानावरून शिंदे गटाचा दसरा मेळावा पाहा इथे थेट
उद्धव ठाकरे संपूर्ण भाषण : शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा संपूर्ण व्हीडिओ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर दाखल झाले आहेत.
व्यासपीठावर प्रवेश करताच त्यांनी त्याठिकाणी ठेवलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आसनावर डोकं टेकवून आशीर्वाद घेतले.
याच आसनावर बसून बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत शेवटचं भाषण केलं होतं, असं आयोजकांनी सांगितलं आहे.
यावेळी दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन तसंच महंतांकडून शंखनाद करण्यात आला.
येथील व्यासपीठावर 51 फुटी भव्य अशी तलवार ठेवण्यात आली आहे. या तलवारीचं पूजन एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलं.
तसंच शिंदे गटातील इतर नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो स्रोत, facebook
कट्टर हिंदू असणं म्हणजे इतर धर्मांचा द्वेष का करणं नाही - सुषमा अंधारे
एकनाथ शिंदे गटातील नेत्यांनी हिंदू धर्माला कलंक लावला आहे. कट्टर हिंदू असणं म्हणजे इतर धर्मांचा द्वेष करणं नाही, अशा शब्दांत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेत्यांवर टीका केली आहे.
शिवाजी पार्क येथे आयोजित दसरा मेळाव्यात अंधारे म्हणाल्या, "ज्याला नांदायचं नाही, त्याला 12 कारणं असतात. पण तुम्ही जे हिंदुत्वाचंं कारण पुढे केलं आहे, ते पूर्णपणे चुकीचं आहे."
तुमचं हिंदुत्व फक्त ईडीच्या कार्यालयात जागृत झालेलं हिंदुत्व आहे, अशा शब्दांत अंधारे यांनी शिंदे गटातील नेत्यांवर निशाणा साधला.
सुषमा अंधारे

फोटो स्रोत, facebook
फोटो कॅप्शन, सुषमा अंधारे उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे शिवाजी पार्क मैदानावर दाखल
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर दाखल झाले आहेत.
यावेळी त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हेसुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. तसंच त्यांचे कुटुंबीयही यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.
उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर दाखल होताच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले.
त्यानंतर ते व्यासपीठाच्या दिशेने रवाना झाले आहेत.
स्वतःही खुराड्यात राहिलात आणि आम्हालाही कोंडून ठेवलं - शहाजीबापू पाटील

फोटो स्रोत, facebook
एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आमदार शहाजी बापू पाटील यांनी थेट मातोश्रीवरच टीकेची तोफ डागली. अडीच वर्षं मातोश्रीचे नेते मातोश्रीतच राहिले. ते खुराड्यातच राहिले आणि त्यांनी आम्हालाही कोंडून ठेवलं, असं शहाजी बापू पाटील म्हणाले.
आता उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे हे दोघेही महाराष्ट्र फिरत आहेत. अडीच वर्षांत तर ते कुठे गेले नव्हते. मग नंतर काय झालं, तर एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीहून औषध आणलं आणि त्यांना दिलं. त्यानंतर दोघेही आता फिरू लागले आहेत. आता सांगायचं काही राहिलं नाही. असे शहाजी बापू म्हणाले.
शहाजी बापू पाटील म्हणाले की काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणे बाळासाहेब ठाकरे यांना कधीच आवडलं नसतं. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आणि आता आम्हाला गद्दार म्हणत आहात असे शहाजी बापू म्हणाले.
शरद पवार यांना बाळासाहेब ठाकरे 'स्काऊंड्रल' आणि 'मैद्याचं पोतं' का म्हणाले होते?

फोटो स्रोत, Getty Images
1999मध्ये शिवसेना शरद पवार यांच्यासोबत जाणार का? असं विचारल्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रश्नाचं गंभीरपणे उत्तर दिलं होतं.
तेव्हाएनडीटीव्ही ला दिलेल्या मुलाखतीत 'शरद पवार यांच्यासोबत जाणार का?' या प्रश्नाला'If anybody trying to be Scoundrel, then how can i stop him?', म्हणजेच 'मी दुष्टपणा करणाऱ्यांना कसा काय रोखू?' असं बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना उद्देशून म्हणाले होते. या मुलाखतीत बाळासाहेबांनीScoundrelया शब्दाचा उल्लेख एकदा नव्हे दोनदा-तीनदा केला होता.
एकनाथ शिंदे गटाची सभा होत असलेल्या बीकेसी मैदानावरही बाळासाहेब ठाकरे यांचा हा व्हीडिओ दाखवण्यात आला.
लिंकवर क्लिक करा आणि वाचा, शरद पवार यांना बाळासाहेब ठाकरे 'स्काऊंड्रल' आणि 'मैद्याचं पोतं' का म्हणाले होते?
स्मिता ठाकरे : रिसेप्शनिस्ट ते ठाकरेंची सून, असा आहे प्रवास
बीकेसी मैदानावर गायन कार्यक्रमास सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होत असलेल्या बीकेसी मैदानावर कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
नंदेश उमप यांचा गायन कार्यक्रम सुरुवातीला आयोजित करण्यात आला आहे.
अवधूत शिंदे आणि स्वप्निल बांदोडकर यांनी यावेळी शिवसेना हे गाणं गायलं.
मैदानाबाहेरही शिवसैनिकांचा उत्साह दिसून येत आहे. महिला फुगडी खेळून आनंद व्यक्त करत आहेत.
दुसरीकडे, शिवाजी पार्कमध्येही याच प्रकारची गाणी वाजवण्यात येत असल्याचं दिसून येतं.

फोटो कॅप्शन, मैदानाबाहेरही शिवसैनिकांचा उत्साह सभेपूर्वी एकनाथ शिंदेंनी बॅनर का बदललं?
LIVE : एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे आणखी आमदार, खासदार फोडलेत का?
दसरा मेळावा भाषणापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक ट्विट

फोटो स्रोत, Facebook/eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी मैदानावरील सभेचं भाषण काही तासांवर येऊन ठेपलेलं असताना त्यांनी केलेल्या एका ट्विटने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हे ट्विट करताना शिंदे यांनी दिग्गज लेखक हरिवंशराय बच्चन यांच्या एका वाक्याचा आधार घेतला.
"मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे" असं ट्विट शिंदे यांनी केलं आहे.
बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आपणच चालवत आहोत, असा संदर्भ या ट्विटच्या माध्यमातून शिंदे यांनी पुन्हा एकदा दिला आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कचं नातं काय आहे?
शिवसेनेची अनेक वर्षांची दसरा मेळाव्याची परंपरा आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना असते. यासाठीच हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर दाखल होतात.
30 ऑक्टोबर 1966 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला होता. दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे एक समीकरण बनलं.
या लिंकवर क्लिक करा आणि वाचा, शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कचं नातं काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, बाळासाहेब ठाकरे
