You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

COP26- हवामान बदलामुळे शेतीचे नुकसान होत आहे - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिषदेत सहभाग नोंदवला.

लाईव्ह कव्हरेज

  1. 2070 पर्यंत भारतातील उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणले जाईल - मोदी

  2. COP26 पर्यावरणविषयक परिषद का होतेय? सोपी गोष्ट 458

  3. हवामान बदलामुळे शेतीत अडथळा निर्माण होत आहे - मोदी

    भारतातल्या शेतकऱ्यांसाठी हवामान बदल काळजीचा विषय आहे. कोणत्याही पिकाच्या उत्पादनात हवामान बदल अडथळा ठरत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

    हवामान बदलासंदर्भात महत्त्वपूर्ण परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत आहेत. ब्रिटनमधील ग्लासगो शहरात रविवारपासून हवामान बदलासंबंधीची COP26 ही परिषद सुरू झाली आहे.

    COP26 31 ऑक्टोबरपासून 12 नोव्हेंबरपर्यंत चालेल. जगभरातील नेते आणि प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले आहेत. परंतु चीनचे राष्ट्रपती शी जिगपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन या परिषदेत सहभागी होणार नाहीत.

    COP26 चं आयोजन हे 2020 मध्ये होणार होतं, मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही परिषद स्थगित करावी लागली.

  4. 'आपली कबर आपणच खोदत आहोत'- संयुक्त राष्ट्रांचे महासचिव, आपली कबर आपणच खोदत आहोत - संयुक्त राष्ट्रांचे महासचिव

    हरितवायूंविरोधातला एक बुलंद आवाज अशी ज्यांची ओळख आहे ते संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अॅंटोनियो गुटेरस यांनी सर्वांना धोक्याचा इशारा दिला आहे.

    आपल्याला जीवाश्म इंधनांचे जे व्यसन लागले आहे त्यामुळे ही मानवजात धोक्यात आली आहे. आपली कबर आपणच खोदत आहोत असं गुटेरस यांनी म्हटलं आहे.

    एकतर या गोष्टी आपण थांबवायला हव्या अन्यथा याच गोष्टी आपल्याला एकेदिवशी थांबवतील. कार्बनद्वारे स्वतःचा मृत्यू ओढावून घेणे थांबवा.

    निसर्गाला शौचालयाप्रमाणे वापरणे थांबवा. आणखी उत्खनन थांबवा. आपण आपलीच कबर खोदत आहोत या शब्दांत गुटेरस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  5. येणारी पिढी आपल्या कामाचे मूल्यमापन करेल - बोरिस जॉन्सन

    आपण काय काम केलं याचं मूल्यमापन पुढील पिढी करेल असे उद्गार युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे.

    आपल्याकडे तंत्रज्ञान आहे पण प्रश्न हा आहे की आपल्याकडे इच्छाशक्ती आहे की नाही? राजकीय नेते म्हणतात की आम्ही 2050 किंवा 2060 मध्ये हे करू. ते करू.

    या ठिकाणी जे उपस्थित नेते आहेत त्यांचे सरासरी वयच 60 वर्षं आहे. आपल्या कामाचे मूल्यमापन येणारी पिढी करेल.

  6. COP26 परिषदेच्या सोहळ्याला सुरुवात

    ग्लासगो येथील COP26 परिषदेच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. बॅगपाइपर्स वाजवून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

    सर्वांत आधी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या भाषणाने होणार आहे. त्यानंतर जगातील विविध नेते आपले मत मांडणार आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सोहळ्यात बोलणार आहेत.

  7. उष्ण लाटा टाळण्यासाठी ग्रामीण भारतात लोकांनी काय काय उपाय शोधून काढलेत?

    हवामान बदलामुळे पूर, अतीवृष्टी, अती उकाडा याचं प्रमाण वाढलंय हे तर खरंच. पण, त्याचबरोबर तापमान वाढीमुळे उकाड्याचा सामनाही लोकांना करावा लागतोय.

    यावर भारतातल्या लोकांनी काही देशी उपाय शोधून काढलेत. थंड ठिकाणी बर्फाच्या खोल्या तर उष्ण शहरांमध्ये शीतखोल्या तयार करण्यासाठी लोक काय अभिनव कल्पना राबवतायत तुम्हीच पाहा.

  8. COP26 परिषदेचा खरंच जगाला उपयोग होईल का?

  9. COP26 मधल्या निर्णयांचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार?

    COP26 ही पर्यावरणविषयक महत्त्वाची परिषद 31 ऑक्टोबरपासून युकेतील ग्लास्गो शहरात सुरू झाली आहे. 2015मध्ये कार्बन वायू उत्सर्जन कमी करण्यासंबंधीचा करार झाला.

    हे उद्दिष्टं नेमकं कसं साध्य करणार? त्यासाठी देशांना कोणती बंधनं लादून घ्यावी लागणार? प्रदूषण कमी करण्यासाठी परिषदेत जे निर्णय होतील त्यांचा तुमच्या आमच्या जीवनावर काय परिणाम होणार?

  10. पृथ्वीसाठी धोक्याची घंटा, तापमान दोन अंशांनी वाढणार

  11. LIVE : क्लायमेट चेंजच्या आव्हानाला महाराष्ट्र कसा सामोरा जाणार?

    मुंबईच्या वरळी गावातून LIVE : क्लायमेट चेंजच्या आव्हानलाा महाराष्ट्र कसा सामोरा जाणार?

  12. COP26 ला शी जिनपिंग यांची अनुपस्थिती, चीनच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह

    जगातील सर्वांत जास्त कार्बन उत्सर्जन करणारा देश असलेल्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे ग्लासगोमध्ये होणाऱ्या हवामान बदलाविषयीच्या परिषदेत सहभागी होणार नाहीयेत.

    त्यांनी या परिषदेत सहभागी होण्यासाठी एक लिखित संदेश पाठवला आहे. त्यानंतर काही जण हवामान बदलासंबंधी चीनच्या बांधिलकीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

    बीजिंग पॉवर प्लांटच्या बाहेरून रिपोर्टिंग करणारे बीबीसी चीनचे प्रतिनिधी स्टीफम मॅकडोनाल्ड सांगतात-

    “ हुएनेंग पॉवर स्टेशनच्या कूलिंग टॉवर्समधून वाफ बाहेर पडते. कधीकाळी इथे कोळसा जाळून वीज निर्मिती केली जायची. मात्र आता इथं गॅसच्या मदतीनं टर्बाइन चालविण्यात येत आहेत.

    चीनच्या राजधानीमधील अधिकारी सांगतात की, या शहरात कोळसा जाळून वीजेचं उत्पादन केलं जात नाही. मात्र शेजारच्या राज्यात अशी परिस्थिती नाहीये. चीनला कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं आपलं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात अनेक अडचणी येत आहेत.

    चीनचे नेते शी जिनपिंग ग्लासगो परिषदेत सहभागी होणार नाहीयेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून ते कोणत्याही कारणासाठी चीनमधून बाहेर पडलेले नाहीत. मात्र त्यांनी या परिषदेसाठी केवळ एक लिखित निवेदन पाठवल्यामुळे काही तज्ज्ञांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

    जगातील सर्वांत मोठ्या कार्बन उत्सर्जक देशाकडून या विषयावर इतकं कमी योगदान दिलं जात आहे, या दृष्टिने जिनपिंग यांच्या अनुपस्थितीकडे पाहिलं जात आहे.”

  13. अतिभयंकर अशा नैसर्गिक आपत्ती आता 'आपल्या जगण्याचा एक भाग होणार'

  14. COP26 काय आहे आणि ते का महत्त्वाचं आहे?

  15. आपण अजून वेळ वाया घालवू शकत नाही- लिओनार्डो डिकॅप्रिओ

    स्कॉटलंड ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या हवामान बदलाशी संबंधित परिषदेला दोनशेहून अधिक देशांचे प्रतिनिधी जमा झाले आहेत.

    COP 26 बद्दल अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओनंही ट्वीट केलं आहे.

    ‘हवामान बदलाचं संकट आलं आहे. लीडर्स जग तुमच्याकडे पाहात आहे आणि या प्रसंगी तुमच्याकडून अपेक्षांवर खरं उतरण्याची गरज आहे. आपण अजून वेळ वाया घालवू शकत नाही.'

  16. COP26 ला उद्देशून प्रिन्स चार्ल्स काय बोलणार?

    प्रिन्स ऑफ वेल्स आज संध्याकाळी ग्लासगो इथं होत असलेल्या COP26 परिषदेला संबोधित करणार आहेत. हवामान बदलाच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी ‘युद्ध पातळी’वर काम करण्याची आवश्यकता आहे, असं ते भाषणात नमूद करतील.

    ब्रिटनच्या राजघराण्यातून COP 26 परिषदेत सहभागी होणारे प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या राजघराण्यातील सर्वांत ज्येष्ठ सदस्य असतील. हवामान बदलावर पावलं उचलण्यासाठी स्कॉटलंडमध्ये सुरू असलेलं संमेलन ही ‘शेवटची संधी’ आहे, असं चार्ल्स यांनी म्हटलं.

    प्रिन्स चार्ल्स हे गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणाशी संबंधित विषयांवर भाष्य करत आहेत. आपल्या आजच्या भाषणात ते हवामान बदलाच्या संकटावर तातडीने पावलं उचलण्यावर जोर देऊ शकतील.

    रविवारी (31 ऑक्टोबर) प्रिन्स चार्ल्स हे रोममध्ये जी-20 संमेलनादरम्यान जगातील नेत्यांना संबोधित करतील.

    त्यांनी म्हटलं होतं, की आपल्यामधील मतभेद विसरून या संधीचा फायदा घेत आपण ‘ग्रीन रिकव्हरी’च्या दिशेने पुढे जाणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये विश्वास निर्माण होईल आणि आपण आपल्या ग्रहाला वाचवू शकू.

  17. पर्यावरण वाचवण्यासाठी, कार्बन उत्सर्जन घटवण्यासाठी जाणून घ्या 4 महत्त्वाच्या गोष्टी

  18. गरीब देश श्रीमंत देशांना कशी मदत करतील?

  19. हवामान बदलाशी लढण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज- बोरिस जॉन्सन

    हवामान बदलाच्या समस्येला सामोरं जाण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी म्हटलं आहे.

    COP 26 परिषदेच्या आधी त्यांनी बीबीसीशी संवाद साधला.

    “हवामान बदलावर आता अपेक्षांकडून कृतीकडे वळण्याची गरज आहे,” यावर जॉन्सन यांनी भर दिलाय.

    ही परिषद आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असल्याचं जॉन्सन यांनी स्पष्ट केलं.

    पुढची चार वर्षं विकसनशील देशांना वर्षाला एक अब्ज युरोची मदत करणार असल्याचंही जॉन्सन यांनी स्पष्ट केलं. अन्य विकसित देशांनीही आपापला हातभार लावावा असं जॉन्सन यांनी म्हटलं.

  20. क्लायमेट चेंजविषयी बोलताना वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे अर्थ काय?

    ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, क्लायमेट क्रायसिस, 4C या संज्ञांमागचा अर्थ आणि त्यातला फरक काय आहे?