आत्मनिर्भर भारत: 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर

काही मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत.

लाईव्ह कव्हरेज

  1. दारूसाठी माणूस काहीही करायला का तयार होतो?

  2. कोरोना व्हायरसचं संकट टाळण्यासाठी कोणते उपाय उपलब्ध आहेत?

  3. आजच्या प्रमुख घडामोडींचा थोडक्यात आढावा –

    नमस्कार मंडळी,

    आजचं लाईव्ह कव्हरेज इथेच थांबवत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजवर.

    जाण्यापूर्वी एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर –

    • नरेंद्र मोदी यांची 20 लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा
    • कृषी विद्यापीठातही फक्त अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची होणार परीक्षा – कृषी मंत्री दादा भुसे
    • महाराष्ट्र सरकारकडून घरपोच दारू विक्रीला परवानगी
    • महाराष्ट्रातील 35 हजारपैकी 17 हजार कैद्यांना जेलमधून सोडण्याचा निर्णय
    • कोरोनाग्रस्तांच्या बाबतीत रशिया आता दुसऱ्या क्रमांकावर
    • वुहानमधल्या सगळ्यांचीच कोरोना चाचणी घेण्याचा चीनचा निर्णय

    शुभरात्री.

    कोरोना

    फोटो स्रोत, maharashtra dgipr

  4. ऐन लॉकडाऊनमध्ये तुरुंगातून सुटलेल्या मराठी माणसाची गोष्ट

  5. कोरोना: लॉकडाऊन-4 भारतात कसा असेल?

  6. कोरोना लॉकडाऊन: महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी लायसन्स लागतं हे तुम्हाला माहिती आहे?

    लॉकडाऊनच्या काळात सरकारने आता घरपोच दारू विक्राली परवानगी दिली आहे पण महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी तुमच्याकडे लायसन्स लागतं, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

    महाराष्ट्रात मद्यउत्पादन, मद्यविक्री आणि मद्यसेवन यासाठी बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट लागू आहे. याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क खाते करते. यासंदर्भातील तरतुदी वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

    दारू

    फोटो स्रोत, Getty Images

  7. #CoronaPodcast : कोरोना व्हायरस संबंधित आज काय घडलं? - पाहा LIVE

    #CoronaPodcast : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली लाॅकडाऊन 4 ची घोषणा. देशासाठी जाहीर केलं 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज. ‘आत्मनिर्भर भारत अभियानाची’ केली घोषणा. मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे काय? लाॅकडाऊन 4 कसं असेल? याबाबत सांगतायत बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड.

  8. कृषी विद्यापीठातही फक्त अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची होणार परीक्षा – कृषी मंत्री दादा भुसे

    राज्यातील 4 कृषी विद्यापीठातही फक्त अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल, अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

    पदवी, पदविका आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्ष सोडून इतर वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश दिला जाणार आहे. त्याकरिता 50 टक्के गुण चालू सत्राच्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित आणि उर्वरित 50 टक्के गुण हे मागील सत्रांचे घोषित निकालांच्या सरासरीवर (CGPA) आधारित देण्यात येतील, असं भुसे यांनी सांगितलं.

    पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षा (आठव्या सत्रातील) ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने 15 जून 2020 पूर्वी घेण्यात येतील आणि या परीक्षेचा निकाल 15 जुलै पूर्वी जाहीर करण्यात येईल.

    कृषि तंत्र निकेतनच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लॉकडाऊन उडल्यानंतर जवळपास 8 ते 15 जूनच्या दरम्यान संबंधित क्षेत्रातील परिस्थितीनुसार घेण्यात येईल.

    पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा आणि संशोधन घटक (शोधनिबंध) हे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या सल्ल्याने घेतले जातील. त्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मुल्यमापन. शोधनिबंध सादर करण्याची अंतिम मुदत आता 31 जुलैपर्यंत आहे, अशी माहिती मंत्री भुसे यांनी दिली.

    पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व पाचव्या सत्राची नोंदणी 1 ऑगस्ट, सातव्या सत्राची नोंदणी 1 जुलै, तर नवीन वर्षाचे प्रथम सत्राचे प्रवेश 1 सप्टेंबरपासून सुरू होणार. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास वरील नियोजनामध्ये काही प्रमाणात फेरबदल होऊ शकतो असंही कृषि मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं.

    दादा भुसे

    फोटो स्रोत, TWITTER

  9. नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 7 महत्त्वाचे मुद्दे

  10. लॉकडाऊन शिथील केल्यानंतरही 'या' देशाचे लोक पाळतात सोशल डिस्टन्सिंग

  11. लॉकडाऊन 4 हे आधीच्या लॉकडाऊनपेक्षा वेगळं असेल - नरेंद्र मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

    • लॉकडाऊन 4 हे आधीच्या लॉकडाऊनपेक्षा वेगळं असेल.
    • यातील नियम 18 मेपर्यंत कळवण्यात येतील.
    • नियमांचं पालन करत आपण कोरोनाशी लढू आणि पुढेही जाऊ.
    • कोरोना मोठ्या काळासाठी आपल्या जीवनाचा भाग असेल, असं शास्त्रज्ञ सांगतात.
    • पण याचा अर्थ असा नाही की आपलं आयुष्य फक्त कोरोनाभोवतीच फिरेल.
    • आपण अंतर राखून काम करू.
    • पण प्रगतीपासून दूर जाणार नाही.
  12. नरेंद्र मोदी यांची 20 लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा

    नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

    • आत्मनिर्भर भारत अभियान विशेष पॅकेजची घोषणा
    • 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज. हे भारताच्या जीडीपीचं जवळपास 10 टक्के.
    • 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज भारतीय अर्थव्यवस्थेला 2020मध्ये नवी गती देईल.
    • गृहउद्योग, छोटे, मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी हे आर्थिक पॅकेज
    • अर्थमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजची माहिती देतील.
    • धाडसी सुधारणा कराव्या लागतील.
    • मागणी-पुरवठ्याची साखळी मजबूत करू.
    • सुधारणांची व्याप्ती वाढवावी लागेल.
    • शेतीच्या पुरवठा साखळीत सुधारणा होतील.
    • करांमध्ये सुधारणा होतील.
    • या सुधारणा उद्योगांना शक्ती देतील आणि गुंतवणुकीला चालना देईल.
    • या पॅकेजमुळे आपल्या सगळ्या क्षेत्रांमधली कार्यक्षमता वाढेल.
    • समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी या पॅकेजमध्ये काही न काही असेल.
    • आजपासून प्रत्येक भारतीयाने लोकलसाठी व्होकल व्हायचंय.
    • स्थानिक उत्पादनं विकत घ्यायची आहेत आणि त्यांचा प्रचार करायचा आहे.
    • संकटाच्या वेळी स्थानिक उत्पादकांनीच आपल्याला वाचवलं.
    • वेळेने आपल्याला शिकवलं आहे की स्थानिक उत्पादनच आपला जीवनमंत्र बनवायचं आहे.
  13. स्वावलंबी भारत पाच पायाभूत तत्त्वांच्या आधारे उभा राहील - नरेंद्र मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

    • एके काळी देशात सुवर्णयुग होतं. त्यानंतर पारतंत्र्य ओढावलं. आता भारताकडे सामर्थ्य आहे.
    • आपण उत्तम उत्पादनं निर्माण करू. हे आपण करू शकतो आणि नक्की करू.
    • भारतीयांनी ठरवलं तर कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही.
    • आत्मनिर्भर भारत पाच खांबांवर उभा राहील
    • अर्थव्यवस्था
    • पायाभूत सुविधा
    • सिस्टिम - तंत्रज्ञानाधारित व्यवस्था
    • आपली डेमोग्राफी
    • मागणी
  14. भारताच्या प्रगतीच्या संकल्पनेत नेहमी विश्वकल्याणाचा विचार - नरेंद्र मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

    • अर्थकेंद्री जागतिकीकरण विरुद्ध मानवकेंद्री जागतिकीकरण अशी चर्चा आता सुरू आहे.
    • आमच्या स्वावलंबीपणाच्या व्याख्येत आत्मकेंद्रीपणा येत नाही. आम्ही वसुधैव कुटुंबकम या उक्तीवर विश्वास ठेवतो.
    • भारताच्या प्रगतीच्या संकल्पनेत नेहमी विश्वकल्याणाचा विचार असतोच.
    • जगात आयुष्य आणि मरणाची लढाई सुरू असताना भारतातली औषधं जीव वाचवत आहेत. भारतीयांना याचा अभिमान आहे.
  15. कोरोना संकटावर एकच मार्ग, 'स्वावलंबी भारत' - नरेंद्र मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

    • आता आपल्याला आपला संकल्प अधिक बळकट करायचा आहे
    • एवढं मोठं संकट कधी बघितलं नव्हतं, ऐकलं नव्हतं.
    • एकविसावं शकत भारताचं असेल, हे स्वप्नच नाही, तर आपली जबाबदारी आहे.
    • आपण राष्ट्र म्हणून महत्त्वाच्या टप्प्यावर उभे आहोत. हे संकट आपल्यासाठी संधी घेऊन आलं आहे.
    • आपण रोज 2 लाख पीपीई किट्स बनवत आहोत. आपण संकटाच संधीत रूपांतर केलंय.
  16. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाला संबोधन - पाहा LIVE

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  17. रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत

    औरंगाबाद रेल्वे धडकेत मृत्यूमुखी पडलेल्या 16 मजुरांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत दिली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान कार्यालयाने केली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मदतनिधी देण्याच्या आदेशाला आज मंजुरी दिली, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 962

    मुंबईच्या धारावी परिसरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 962 वर पोहोचली आहे.

    आज धारावीमध्ये 46 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं. तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला. धारावीत आतापर्यंत 31 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  19. वुहानमधल्या सगळ्यांचीच कोरोना चाचणी घेण्याचा चीनचा निर्णय

    वुहानमध्ये राहणाऱ्या सगळ्याच नागरिकांची कोरोना व्हायरसशी संबंधित चाचणी घेण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे.

    चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहान शहराची लोकसंख्या 1 कोटी 10 लाख आहे. या सगळ्याच नागरिकांची चाचणी घेण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.

    याबाबत वुहान जिल्हातील सर्व शहरांना 10 दिवसांत लोकांची टेस्टींग कशा प्रकारे पूर्ण केली जाईल, याबाबत अहवाल मागितला आहे.

    वुहानमध्ये एका सोसायटीतील 6 जण पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सरकारने इतका मोठा निर्णय घेतला आहे.

    वुहानमध्येच पहिल्यांदा कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली होती. इथं आतापर्यंत 11 आठवड्यांचं लॉकडाऊन करण्यात आलं होतं.

    8 एप्रिलला इथला लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्यात आला. पण आता पुन्हा काही रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

    चीन

    फोटो स्रोत, Getty Images

  20. रुग्णांनी ऑनलाईन ई-संजीवनी बाह्यरुग्ण सेवेचा लाभ घ्यावा – राजेश टोपे

    लॉकडाऊनमुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद असल्याने नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन राज्यात ऑनलाईन ई-संजीवनी बाहुयरुग्ण सेवा सुरू करण्यात आली आहे. http://esanjeevaniopd.inयासंकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त