कोरोना व्हायरस: महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 23,401
भारतातील कोरोनाच्या केसेस 67,000 च्यावर गेल्या आहेत. देशातला रिकव्हरी रेट 31.15% गेला असल्याची माहिती आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
लाईव्ह कव्हरेज
रेल्वेगाड्या रद्द झाल्या आहेत का? रेल्वे मंत्रालय काय म्हणतंय?
आज दिवसभरात काय घडलं?
नमस्कार मंडळी,
कोरोना व्हायरस संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स बीबीसी मराठी दररोज लाईव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आजही आपण महाराष्ट्र, भारत आणि जगभरातले अपडेट्स जाणून घेतले.
आता आपली भेट उद्या सकाळी होईल. पण टाटा, बाय-बाय करण्यापूर्वी आज दिवसभरात महत्त्वाचं काय घडलं, त्यावर अगदी थोडक्यात नजर टाकूयात आणि मग थांबूयात.
1) महाराष्ट्रात आज 1230 नवे रुग्ण आढळले असून, रुग्णांची एकूण संख्या 23,401 झालीय.
2) गेल्या 24 तासात भारतात 4213 नवे रुग्ण आढळले. भारतातील रुग्णांची एकूण संख्या 67,152 एवढी झालीय. यातील 44 हजार लोक डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
3) 12 मे पासून पॅसेंजर ट्रेन सुरू होतील, सुरुवातीला फक्त 15 गाड्या धावतील. यासंदर्भातील सविस्तर वृत्त तुम्ही इथे वाचू शकता.
4) मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे व्हीडिओद्वारे संवादादरम्यान केली.
5) लॉकडाऊन सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनासंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 3 लाख 32 हजार 843 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच, 2,58,792 अलगीकरण (Quarantine) करण्यात आले आहे.
6) महाराष्ट्रातील रेड झोन वगळता इतर ठिकाणच्या 57,745उद्योगांना परवाने दिले असून 25 हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे.
7) केंद्र सरकारच्या 'वंदे मातरम' मिशनच्या अंतर्गत 10 मे पर्यंत 23 विमानं पाठवून परदेशात अडकलेल्या जवळपास 4000 भारतीयांना मायदेशी आणलं गेलं.
8) चीनच्या वुहान शहरात महिन्याहून जास्त कालावधीनंतर कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
9) कोरोनाच्या 288 रुग्णांपैकी 149 रुग्ण उपाचारानंतर बरे झाल्याचं व्हिएतनाम सरकारनं जाहीर केलं आहे. व्हिएतनामध्ये लॉकडाऊन हटवण्यात आला आहे आणि हनोईमध्ये सोमवारपासून सगळे ऑफिसेस सुरू होतील.
10) रशियात गेल्या 24 तासात 11 हजार 656 नवे रुग्ण सापडले आहेत. रशियातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,21,344 झालीय. अमेरिका, स्पेन या देशांनंतर रशियात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
शुभ रात्री, उद्या सकाळी भेटूयात.
'ब्रिटनच्या काही भागात पूर्ण लॉकडाऊन आवश्यक'
ब्रिटनमधील काही भागात 'पूर्ण लॉकडाऊन' असणं गरजेचं आहे. मात्र, हे लॉकडाऊन थोड्या काळासाठीच हवंय, असं बोरिस जॉन्सन म्हणाले. त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्समधील आपल्या भाषणात सांगितलं.
सार्वजनिक वाहनातून प्रवासादरम्यान मास्क बंधनकारक आहे. मात्र, वैद्यकीय मास्कचा त्यात समावेश नाहीय. वैद्यकीय मास्क ज्यांना आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी ठेवले पाहिजेत, असेही जॉन्सन म्हणाले.
तसंच, लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्याला त्यांनी दुजोरा दिला. लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 60 पाऊंडवरून 100 पाऊंड दंड आकारला जाईल. दुसऱ्यांना उल्लंघन केल्यास दंड दुप्पट आकरला जाईल.

महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 23 हजार 401 वर पोहोचली
- महाराष्ट्रात आज 1230 नवे रुग्ण आढळले असून, रुग्णांची एकूण संख्या 23,401 झालीय.
- आज राज्यात 36 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 868 जणांचा मृत्यू झालाय.
- आज 587 रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 4786 एवढी झालीय.
- एकट्या मुंबईत रुग्णांची संख्या 14,521 झालीय. तर मुंबईत आतापर्यंत 528 जणांचा मृत्यू झालाय.
रेल्वेने प्रवास करायचाय मग हे नियम माहीत असणं आवश्यक आहे
12 मे पासून पॅसेंजर ट्रेन सुरू होतील, सुरुवातीला फक्त 15 गाड्या धावतील. देशात लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वीच पॅसेंजर ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या.
यासंदर्भातील सविस्तर वृत्त तुम्ही इथे वाचू शकता.
नागपुरात कोरोनाचा चौथा बळी
नागपुरात करोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. अचलपूर परिसरातील कर्करोग असलेल्या 43 वर्षीय व्यक्तीला नागपूरला उपचाराला आणण्यात आले होते. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरोनाची चाचणी घेतली असता, या रुग्णाचा अहवाल करोना पझिटिव्ह आला.
धारावीतल्या रुग्णांची संख्या 916 वर पोहोचली
मुंबईतील धारावी झोपडपट्टीत रुग्णांची संख्या वेगानं वाढताना दिसतेय. धारावीत 57 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं एकट्या धारावीतल्या रुग्णांची संख्या 916 वर पोहोचलीय.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मथुरेतील कामगारांच्या परतीबाबत हेमा मालिनींची राज्यपालांशी चर्चा
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील खासदार हेमा मालिनी यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः मथुरा येथे परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल चर्चा केली.

फोटो स्रोत, Maharashtra Governor Office
उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसमोर मांडलेले मुद्दे :
देशातील सर्व मुख्यमंत्र्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हीडिओद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे काही मागण्याही केल्या.
- मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करावी, ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी
- लॉकडाऊनच्या बाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, आम्ही सर्व राज्ये त्याप्रमाणे अंमलबजावणी करू
- मुंबई मध्येही उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी
- महाराष्ट्रात कोरोना पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना सुरु होती. मात्रे काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: विदर्भात निवडणुकांमुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. आता खरीप हंगाम सुरु झाला आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला केंद्रामार्फत सुचना द्याव्यात, सुमारे 10 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल

फोटो स्रोत, SHIVSENA/FACEBOOK
- राज्याला 35 हजार कोटींचा फटका बसला असूनजीएसटी परताव्यापोटी तसेच केंद्रीय कराच्या हिशापोटी संपूर्ण रक्कम लवकरात लवकर मिळावी म्हणजे या संकट समयी मदत होऊ शकेल
- वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी शुल्क माफ करावे तसेच काही संस्था उपकरणे आयात करीत आहेत सीमा शुल्कात सवलत द्यावी
- डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. विशेषत: पोलिसानामधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे , त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचे काम आहे, ते आजारी पडून चालणार नाहीत्यामुळेआवश्यकता भासेल तसे केंद्र सरकारने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचाताण कमी होईल.त्याचप्रमाणे केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधाही मिळाल्यास पुढे कोरोनाशी लढतांना त्याचा उपयोग होईल.
IRCTC ची वेबसाईट पुन्हा सुरू
नियोजित वेळेच्या दोन तास उशिरानं सुरू झालेली IRCTC ची वेबसाईट अवघ्या दहा मिनिटात बंद पडली होती. अखेर ती पुन्हा सुरू झाली असून, बुकिंगही सुरू झालीय.
संध्याकाळी चार वाजता वेबसाईट सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र, काही कारणास्तव दोन तास उशीर झाला. सहा वाजता सुरू झालेली वेबसाईट पुढच्या दहा मिनिटातच पुन्हा बंद पडली होती.
हावडा-नवी दिल्ली या मार्गावरील रेल्वेची थर्ड एसीची तिकिटं तर अवघ्या दहा मिनिटातच संपली.
रेल्वेचं तिकीट हेच प्रवाशांसाठी पास असणार आहे. त्यांना वेगळ्या पासची आवश्यकता नसेल.
पाहा व्हीडिओ : कोरोना विषाणू वटवाघळांमधून माणसापर्यंत कसा आला?
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
भारतीय रेल्वेकडून 30 स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक जारी
12 मे 2020 पासून धावणाऱ्या 30 स्पेशल ट्रेनचं वेळपत्रक भारतीय रेल्वेनं जारी केलंय. नवी दिल्ली ते विविध ठिकाणच्या रेल्वेस्थानकांपर्यंत या रेल्वे धावतील.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
रशियात गेल्या 24 तासात 11 हजार नवे रुग्ण सापडले

फोटो स्रोत, Getty Images
रशियात गेल्या 24 तासात 11 हजार 656 नवे रुग्ण सापडले आहेत. रशियातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,21,344 झालीय.
यूके आणि इटली या देशांनाही रशियानं रुग्ण संख्येत मागे टाकलंय. अमेरिका, स्पेन या देशांनंतर रशियात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
रशियात मृतांची संख्या 2009 वर पोहोचलीय. गेल्या 24 तासात 94 जणांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात अत्यावश्यक सेवेसाठी 3 लाख 32 हजार 843 पास वाटप
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोरोनासंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 3 लाख 32 हजार 843 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच, 2,58,792 अलगीकरण (Quarantine) करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.
“कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्धकडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत,” असेही अनिल देशमुख यांनी सांगितलं.
लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवरहल्ला होण्याच्या 207 घटना घडल्या. त्यात 747 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

फोटो स्रोत, Twitter
महाराष्ट्रातील 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू– उद्योगमंत्री
महाराष्ट्रातील रेड झोन वगळता इतर ठिकाणच्या 57,745उद्योगांना परवाने दिले असून 25 हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

फोटो स्रोत, Twitter/Subhash Desai
- वीज बिलात सवलत -स्थिर वीज बिलाबाबत उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली असून जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीदेखील सवलती जाहीर केल्या आहेत, असे देसाई यांनी सांगितले.
- लघु उद्योगांसाठी लवकर आर्थिक पॅकेज -राज्यातील लघू उद्योगांना सावण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासंबधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयुष गोयल यांच्याशी दैनंदिन चर्चा सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले. याशिवाय राज्य शासन लघु उद्योगांना इतर सुविधा पुरवण्याबाबत धोरण ठरवत आहे.
- विदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी वाटाघाटी सुरू–“राज्यात विदेशी गुंतवणूक यावी, यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. अनेक देश महाराष्ट्राकडे चौकशी करत आहेत. अमेरिका, इंग्लड, जर्मनी, जपान, तैवान, दक्षिण कोरिया येथील प्रतिनिधी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. पुढील काळात राज्यात अनेक मोठे प्रकल्प सुरू होणार असल्याने लघु उद्योगांनी सेवा पुरवण्यासाठी सज्ज रहावे,”असे सुभाष देसाईंनी सांगितलं.
परदेशातील किती भारतीयांना मायदेशी आणलं?
- केंद्र सरकारच्या 'वंदे मातरम' मिशनच्या अंतर्गत 10 मे पर्यंत 23 विमानं पाठवून परदेशात अडकलेल्या जवळपास 4000 भारतीयांना मायदेशी आणलं गेलं.
- मालदीवमधील जवळपास 200 भारतीयांना घेऊन भारतीय नौसेनेचं जहाज रवाना झालंय. समुद्रामार्गे आतापर्यंत 698 भारतीयांना परत आणलंय.
- श्रमिक स्पेशळ रेल्वेच्या माध्यमातून आतापर्यंत पाच लाख भारतीयांना आपापल्या घरापर्यंत पोहोचवलं गेलंय. आतापर्यंत एकूण 468 ट्रेन धावल्या.
(वरील माहिती गृहमंत्रालयानं दिलीय)

फोटो स्रोत, @CGIDUBAI
कोरोनाची लक्षणं लपवू नका - आरोग्य मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं लोकांना आवाहन केलंय की, "कोरोनाची लक्षणं दिसल्यास कुणीही लपवू नयेत. तातडीनं संबंधितांना सागून उपचार सुरू करावेत. आपण लक्षणं लपवून ठेवली, तर केवळ तुम्हीच आजारी पडणार नाहीत, तर कुटुंबीयांच्या आरोग्यालाही धोक्यात घालत असाल."
तसंच, "वैद्यकीय स्थितीच्या आधारे आणि डिस्चार्जच्या नव्या धोरणानुसार, सौम्य आणि मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांना कुठल्याही चाचणीशिवाय सोडलं जाऊ शकतं. अशा प्रकरणात अलगीकरणासाठी नवे नियम जारी केले गेलेत. या नव्या नियमांनुसार, घरातच अलगीकरण केल्यानंतर पुन्हा चाचणीची गरज नसेल," असं केंद्र सरकारनं सांगितलं.

फोटो स्रोत, ANI
फोटो कॅप्शन, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 67 हजारांवर पोहोचली
केंद्रीय आोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय आणि ICMR ने भारतातील कोरोना व्हायरसशी संबंधित माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली.
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात भारतात 4213 नवे रुग्ण आढळले, तर 1559 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले
- भारतात आतापर्यंत जवळपास 21 हजार रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. भारतातील रिकव्हरी रेट 31.15टक्के आहे.
- भारतातील रुग्णांची संख्या 67,152 एवढी झालीय. यातील 44 हजार लोक डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

फोटो स्रोत, Reuters
कामगार कायद्यातील बदलांवरून राहुल गांधींची टीका
कोरोनामुळे औद्योगिक क्षेत्राला फटका बसू नये म्हणून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात यांसारख्या राज्यांनी कामगार कायद्यात बदल केले आहेत. या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी टीका केलीय.

फोटो स्रोत, Twitter
कामगार कायद्यातील बदलांसंदर्भात बीबीसी मराठीनं बातमीही प्रसिद्ध केलीय. तुम्ही ती बातमी इथे वाचू शकता.
