पुण्यात कंटेनमेंट झोनमध्ये 17 मेपर्यंत फक्त दवाखाने सुरू राहणार
उड्डाणपूर्व आरोग्य चाचणीमध्ये मुंबईतील 5 वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व एअर इंडियाचे वैमानिक आहेत.
लाईव्ह कव्हरेज
रेल्वेगाड्या रद्द झाल्या आहेत का? रेल्वे मंत्रालय काय म्हणतंय?
एसटी प्रवास सरसकट सर्वांसाठी मोफत नाही, राज्य सरकारचा नवा निर्णय
आज दिवसभरात काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो नमस्कार मंडळी,
कोरोना व्हायरस संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स बीबीसी मराठी दररोज लाईव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आजही आपण महाराष्ट्र, भारत आणि जगभरातले अपडेट्स जाणून घेतले.
आता आपली भेट उद्या सकाळी होईल. पण टाटा, बाय-बाय करण्यापूर्वी आज दिवसभरात महत्त्वाचं काय घडलं, त्यावर अगदी थोडक्यात नजर टाकूयात आणि मग थांबूयात.
1.महाराष्ट्रात कोरोनाचे 1,278 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 22 हजार 171 वर पोहोचली.
2.पुण्यात कंटेनमेंट झोनमधील दवाखाने वगळता सर्व दुकानं 11 मे ते 17 मे पर्यंत बंद असतील.
3.12 मे पासून पॅसेंजर ट्रेन टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला.
यासंबंधीची सविस्तर बातमी तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून वाचू शकता.
5.मजूरांच्या प्रवासाच्या तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीतून भरण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला.
6.चीनच्या वुहान शहरात महिन्याहून जास्त कालावधीनंतर कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
7.जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 40 लाख 38 हजार 447 वर पोहोचली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत 2 लाख 79 हजार 468 जणांचा मृत्यू झालाय.
शुभ रात्री, उद्या सकाळी भेटूयात.
महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे 1,278 नवीन रुग्ण, तर 53 जणांचा मृत्यू
रविवारी राज्यात कोरोनाचे 1,278 नवीन रुग्ण आढळले असून 53 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. रविवारी 399 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 22 हजार 171 वर पोहोचली आहे.
आतापर्यंत राज्यातील 832 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

फोटो स्रोत, maharashtragovernment
फोटो कॅप्शन, आकडेवारीचं सरकारी पत्रक 'त्या' जगप्रसिद्ध मीम्समधल्या हिरोलाही असा बसलाय लॉकडाऊनचा फटका
मजुरांच्या तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीतून
परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत, तसंच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत.
ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मागणीप्रमाणे ही रक्कम निधीतून वर्ग करण्यात येईल.
ब्रेकिंग, वुहानमध्ये महिन्याभरानंतर आढळला कोरोनाचा नवा रुग्ण
चीनच्या वुहान शहरात महिन्याहून जास्त कालावधीनंतर कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
स्थानिक माध्यमांनुसार, 89 वर्षांच्या रुग्णाची स्थिती गंभीर असून त्यांच्यात सुरुवातीला कोरोनाचे लक्षणं आढळले नव्हते.
या रुग्णाच्या संपर्कातील लोकांवर बारईकानं लक्ष दिलं जात आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं कोरोनाच्या 14 नव्या रुग्णांची नोंद केली आहे, त्यात वुहानमधील रुग्णाचा समावेश आहे.
चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 82,901 रुग्ण आढळले असून वहाँ 4,633 जणांचा मृत्यू झालाय.

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो उद्यापासून पॅसेंजर ट्रेनचं बुकिंग सुरू - पीयष गोयल
12 मे पासून पॅसेंजर रेल्वे सेवा हळूहळू सुरू करण्यात येईल. सुरुवातीला नवी दिल्लीतून स्पेशल ट्रेन्स देशातल्या 15 मुख्य शहरांपर्यंत धावतील.
11 मे रोजी दुपारी 4 वाजल्यापासून या ट्रेनसाठी बुकिंग सुरू होईल.
रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
#CoronaPodcast : आज काय घडलं?
#CoronaPodcast : राज्यात वेगवेगळ्या भागांत अडकलेल्या नागरिकांना ST चा प्रवास मोफत आहे की नाही, याबाबत अजूनही संभ्रम कायम.
उत्तर प्रदेश, गुजरातसारख्या राज्यांनी रद्द केले कामगार कायदे, याचा अर्थ आणि परिणाम काय? कोरोनातून बरे होत जितेंद्र आव्हाड परतले घरी.
आज दिवसभरात काय घडलं, पाहा बीबीसी मराठीचा हा लाईव्ह कोरोना पॉडकास्ट.
मध्य प्रदेशातील 1,172 मजूरपुण्याहून रवाना - नवल किशोर राम
पुणे जिल्ह्यातल्या दौंड आणि पुरंदर तालुक्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेशमधील 1,172 मजुरांना विशेष श्रमिक रेल्वेद्वारे दौंड रेल्वे स्टेशनयेथून आज सायंकाळी 5 वाजता रवाना करण्यात आलं आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली आहे..

फोटो कॅप्शन, पुण्याहून सुटलेली ट्रेन सध्या फक्त मजूरांची ने-आण करत आहोत - विजय वडेट्टीवार
महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यात अडकलेले मजूर त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडणे आणि सीमेवरून वेगवेगळ्या राज्यात अडकलेले आपले लोक परत आणणे एवढच सध्या राज्य सरकार करत आहे, अशी माहिती सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बीबीसी मराठीला दिली.
त्यांनी मांडलेले इतर मुद्दे -
1. आधी मजूरांच्या बसेस सोडणे आणण्याचं काम होईल. ही सेवा मोफत असणार आहे..
2. त्यानंतर जिल्हाअंतर्गत लोकांना इच्छुक ठिकाणी जाण्यासाठी एसटी सोडण्यात येतील.
3. तो प्रवास सरसकटपणे मोफत करावा की नाही यावर विचार सुरू आहे. उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय करू.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसं काम करतं? आरोग्य सेतू अॅपवर तुमचा डेटा किती सुरक्षित?
महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल - संजय राऊत
"राज्यातील कोरोना संकट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उमेदवारी याचा विचार करून काँग्रेस पक्षानं एक ऊमेदवार मागे घेण्याची भूमिका घेतली आहे. मी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचा आभारी आहे," असं ट्वीट करत महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी घोषणा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातल्या विधानपरिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली होती.
त्यानंतर 21 मे रोजी विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं होतं.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पुणे : कंटेनमेंट झोनमध्ये दवाखाने वगळता सर्व दुकानं 11 मे ते 17 मे पर्यंत बंद
पुणे शहरात अत्यंत आवश्यकता भासल्यास कंटेनमेंट झोनमध्ये दूध, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा महापालिका आणि पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थिती लक्षात घेता घरपोच किंवा मोकळ्या जागेत सुरक्षित अंतर ठेवून करता येईल.
अन्यथा कंटेनमेंट झोनमध्ये दवाखाने वगळता इतर सर्व दुकानं 11 मे पासून 17 मे पर्यंत बंद राहतील.
पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज हा आदेश दिला आहे.
पुणे शहरात 69 कंटेनमेंट झोन आहेत.

फोटो कॅप्शन, आदेशाचं पत्रक लॉकडाऊन असतानाही हे लोक लग्न कशी करत आहेत?
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
ठाकरे सरकारच्या दिशेने कोरोना संकटांचे इंजिन आणि आव्हानांचे डबे
कोरोनामुळे इतिहासकार हरी शंकर वासुदेवन यांचा मृत्यू
इतिहासकार हरी शंकर वासुदेवन यांचा कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.
68 वर्षांच्या वासुदेवन यांचा कोलकात्यातल्या एका खासगी दवाखान्यात मृत्यू झाला.
ते युरोपीय आणि रशियन इतिहासासोबतच भारत-रशिया संबंधांचे जाणकार होते.
"वासुदेवन यांना 4 मे रोजी दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शनिवारी रात्री त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आला," असं दवाखान्यातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

फोटो स्रोत, PRABHAKAR MANI TIWARI
फोटो कॅप्शन, हरी शंकर वासुदेवन ITBPमधील आणखी 56 जवानांना कोरोनाची लागण
गेल्या 24 तासात इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा दलातील (ITBP) 56 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.
त्यामुळे ITBPमधील कोरोना रुग्णांचा आकडा 156 वर पोहोचला आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोरोना लढ्यातील अंगणवाडी सेविकांसाठी महिला आणि बालविकास मंत्र्यांची कविता
कोरोनाचा सामना करण्यात अग्रस्थानी असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कविता केली आहे.
ट्वीट करत त्यांनी म्हटलं, "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका ज्या पद्धतीने लोकांची काळजी घेत आहेत ही बाब खरंच उल्लेखनीय आहे. आज मातृदिना निमित्त त्यांच्यावर केलेली कविता."
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
