आज दिवसभरात काय काय घडलं?
बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजमध्ये आपण दिवसभरातले अपडेट पाहिले. दारुविक्रीला सुरूवात झाल्यानं सोशल डिस्टन्सिंगचे वाजलेले तीन तेरा आणि स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवासाच्या खर्चावरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीघेतलेले आक्षेप, त्यावरुन झालेले आरोप प्रत्यारोप यामुळे आजचा दिवस चर्चेत राहिला. या सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवून आजच्या लाइव्ह पेजमध्ये इथेच थांबतोय.
पण गुड नाइट, बाय-बाय म्हणण्याआधी दिवसभरात अजून काय काय घडलं ते अगदी थोडक्यात...
- सशर्त परवानगी मद्यविक्रीला सुरुवात, दारू खरेदीसाठी अनेक ठिकाणी दारुच्या दुकानांबाहेर लांबच लांब रांगा. सोशल डिन्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवल्यामुळे काही ठिकाणी पोलिसांची कारवाई
- परदेशात अडकलेल्या भारतीयांना 7 मेपासून टप्प्याटप्प्याने परत आणणार असल्याची माहिती केंद्र सरकारने आज दिली.
- लॉकडाऊन वाढवल्यामुळे चारपेक्षा अधिक लोकांच्या एकत्र जमण्यावरचे निर्बंध 17 मे पर्यंत कायम राहतील असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
- देशात 42 हजार 533 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत कोव्हिड-19 चे 11,706 रुग्ण बरे झाले आहेत.
- केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 31 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून 20 मे रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन तारीख जाहीर करण्यात येईल, असं केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे.
- 4 मे 2020च्या दुपारपर्यंत जगभरात 35 लाख 5 हजार 761 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत 2 लाख 49 हजार जणांचा बळी गेला आहे.
यापुढील अपडेटसाठी इथे क्लिक करा.

फोटो स्रोत, Getty Images







