नवीन शैक्षणिक सत्र 1 सप्टेंबरपासून - UGCने घेतले हे मोठे निर्णय
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
प्लाझ्मा थेरपीचा कोरोनाग्रस्तांना फायदा नाही - एम्स हॉस्पिटल
शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरपासून आणि स्थलांतरित कामगारांना घरी परतता येणार
आज काय काय घडलं?
-कोरोनामुळे देशभरात मृत्यू होणाऱ्यांची संख्या हजारच्या पुढे गेली आहे.
-राज्यात 32 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर दोनशेहून अधिकजणांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आज 592 नव्या रुग्णांची नोंद झाली.
-कोरोना प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
-कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे हजारो स्थलांतरित कामगार, प्रवासी, विद्यार्थी अनेकठिकाणी अडकले आहेत. त्यांना त्यांच्या घरी परतता यावं यासाठी योग्य उपाययोजना करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नियमावली तयार केली आहे. दोन्ही राज्यांच्या सहमतीने, टेस्टिंग केल्यानंतरच बसने या नागरिकांना आपल्या मूळ राज्यात परतता येईल.
कोरोनासंदर्भात राज्य, देश तसंच आंतरराष्ट्रीय अपडेट्स इथं एकाच क्लिकवर तुम्हाला मिळू शकतील. तूर्तास इथे थांबूया.
कोरोना व्हायरसचा जन्म नेमका कुठे आणि कसा झाला?
देशात कोरोना मृत्यूंनी ओलांडला हजारचा आकडा
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 22,982 असून, आतापर्यंत 1008 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
7796 जण कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत.
भारतात खरंच कोरोनाचा मृत्युदर दिसतोय तितकाच कमी आहे का?
जर्मनीत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर १४ जूनपर्यंत प्रतिबंध

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, जर्मनीने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील प्रतिबंध वाढवला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, जर्मनीने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर 14 जूनपर्यंत प्रतिबंध घातला आहे.
आधीच्या आदेशाप्रमाणे 3 मे पर्यंतच प्रतिबंध होता. मात्र कोरोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेऊन जर्मनीने हा निर्णय घेतला आहे.
जर्मनीत आतापर्यंत 6, 314 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जर्मनीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक लाख साठ हजार एवढी आहे.
असंघटित कामगारांच्या रोजीरोटीवर संकट
कोरोना संकटामुळे जगभरातील निम्म्याहून अधिक असंघटित कामगारांना रोजीरोटी गमवावी लागू शकते असा इशारा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं दिला आहे.
दीड अब्ज कामगारांच्या कामावर गदा येण्याची शक्यता आहे.
कोरोनाचं संकट गहिरं झाल्यानंतर जगभरात दोन अब्जहून अधिक कामगारांचं वेतन 60 टक्क्यांहून घटलं आहे.
लाखो लोकांसाठी कमाईचा मार्ग बंद झाला आहे. त्यांना दोन वेळचं जेवणही मिळत नाहीये. भविष्यात काम मिळेल का हे त्यांना ठाऊक नाही असं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक गाई रायडर यांनी सांगितलं.
आपण या असंघटित कामगारांची मदत केली नाही तर त्यांचं जीवन संपुष्टात येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
राज्यात आज 32 मृत्यू; दोनशेहून अधिक रुग्णांना घरी सोडलं
राज्यात कोरोनामुळे आज 32 लोकांनी जीव गमावला. त्याचवेळी 597 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9915 इतकी झाली आहे. 205 कोरोना रुग्णांना बुधवारी घरी सोडण्यात आलं.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
नवीन शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून
युनिर्व्हसिटी ग्राँट कमिशनने काढलेल्या परिपत्रकानुसार यंदाचं शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आधीच सुरू झालेल्या अभ्यासक्रमांसाठी हे वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू होईल.
सेमिस्टरच्या शेवटी घेण्यात येणारी परीक्षा जुलै महिन्यात आयोजित करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
प्रत्येक विद्यापीठाने आपापल्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन परीक्षांची आखणी करावी असं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
एमफिल, पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्यांची मुदत वाढवण्यात आली आहे. व्हायवा व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
स्थलांतरितांना गावी परत पोहोचवण्यास केंद्र सरकारची मंजुरी: अशा आहेत सूचना
प्लाझ्मा थेरपी पहिला प्रयोग यशस्वी - आरोग्य मंत्री टोपेंची माहिती
जगभरात बोलल्या जात असलेल्या प्लाझमा थेरपीमध्ये यश मिळाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितलं.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "प्लाझमा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी झालाय, असं मला मुंबई मनपा आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितलं. या थेरपीसंदर्भातल्या गाईडलाइन्स योग्यरीत्या फॉलो झाल्या तर नक्की हे यशस्वी होईल," असं टोपेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
नागपुरात सामूहिक क्वारंटाईननंतर लोकांना पुढे येण्याचं आवाहन
नागपुरातल्या सतरंजीपुरा हॉटस्पॉटमधून दोन दिवसांपूर्वी जवळजवळ 1200 लोकांना हलवण्यात आलं होतं.
"हा संपूर्ण परिसर रिकामा करून, लोकांची आता चाचणी घेतली जाणार आहे. ज्यांच्यात लक्षणं नाहीत, त्यांना 14 क्वारंटाईनमध्ये टाकण्यात येईल, आणि ज्यांच्यात लक्षणं असतील त्यांना तातडीने उपचारासाठी भरती केलं जाईल," असं मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.
लोकांमध्ये कुठलीही कोरोनासदृश लक्षणं दिसत असतील तर त्यांनी पुढे यावं, असं आवहनसुद्धा त्यांनी केलं आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
21 हजारपेक्षा जास्त बळी - युके कसा करतोय कोरोनाचा सामना?
ब्रेकिंग, स्थलांतरित कामगारांना घरी पाठवण्यासाठी व्यवस्था करा - केंद्र सरकारच्या सूचना

लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या अन्य राज्यातील स्थलांतरित मजुरांची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतूक करण्यास मुभा देण्यात आली आहे. याकरता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यांना गाईडलाईन्स आखून देण्यात आल्या आहेत.
लॉक डाऊनमध्ये अडकलेल्या लोकांच्या आंतरराज्यीय वाहतुकीबाबत केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स अशा आहेत
1. परप्रांतीय मजुर, पर्यटक, तीर्थयात्री, विद्यार्थी या सर्वांना काही अटींसह प्रवासाची परवानगी.
2. ज्या दोन राज्यांमध्ये प्रवास करायचा आहे त्या दोन्ही राज्यांची सहमती आवश्यक
3. बसनेच वाहतुकीस परवानगी देण्यात येईल.
4. प्रवास करणाऱ्या सगळ्यांची चाचणी घेणं बंधनकारक असेल.
वरळीचा धोका टळलेला नाही- महापौर

फोटो स्रोत, twitter
फोटो कॅप्शन, मुंबईच्या महापौैर किशोरी पेडणेकर वरळी अजूनही पूर्णपणे कोरोनामुक्त झालेलं नाही. वरळीचा धोका टळलेला नाही असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
नर्स म्हणून काम केलेल्या किशोरी काही दिवसांपूर्वी नर्सच्या पोशाखात हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. त्याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, "मी नर्सिंगच्या मुलींना लेक्चर देण्यासाठी गेले होते. तिथल्या डिनने मला नर्स ड्रेस घालून लेक्चर द्या असं सांगितलं जेणेकरून मी त्या मुलींना त्यांच्यातलीच वाटेन म्हणून मी नर्सचा ड्रेस घातला. पण मला आजही नर्स म्हणून सेवा देण्याची संधी मिळाली तर मी नक्की तयार आहे".
त्या पुढे म्हणाल्या, "५५ वर्ष वयाच्या पुढच्या लोकांना सेवेत घेता येत नाही. माझं वय ५८ आहे त्यामुळे मला नर्सची सेवा देता येणार नाही. पण उध्दव ठाकरेंनी सांगितलं तर मी आजही तयार आहे".
धारावीच्या साधारण ४-५ हजार लोकांना (जे कोरोनाबाधीत नाहीत त्यांना) दुसरीकडे हलवण्याचा विचार महापालिका करतेय. त्यासाठी विविध मैदानात आम्ही विशेष व्यवस्था करतो आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
म्हणून व्हेंटिलेटरवरील रुग्णांचं प्रमाण कमी- डॉ.हर्षवर्धन
देशभरातल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी केवळ 0.33 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर 1.5 टक्के रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. 2.34% टक्के रुग्ण ICUमध्ये आहेत. देशातल्या आरोग्यसेवेचा दर्जा चांगला असल्यानेच हे प्रमाण आपण कमी ठेऊ शकलो आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.
जगात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदराचं प्रमाण 7 टक्के आहे. भारतात आपण हे प्रमाण 3 टक्के आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये को-मॉर्बिडिटी अर्थात अन्य गंभीर आजार असण्याचं प्रमाण 86 टक्के आहे असंही त्यांनी सांगितलं.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पोलिसांवर हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत-अनिल देशमुख
राज्यात 156 ठिकाणी पोलिसांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासंदर्भात 550 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
मालेगाव हॉटस्पॉट बनलं असून, तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्याचं त्यांनी सांगितलं. यंत्रणेत काही त्रुटी असतील तर त्या दूर करू असं आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिलं.
बोरिस जॉन्सन यांना पुत्ररत्न
युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या त्यांच्या जोडीदार केरी सायमंड्स यांनी बाळाला जन्म दिला.
काही दिवसांपूर्वी बोरिस यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनी घरीच क्वारंटीन होण्याचा निर्णय घेतला होता. देशाचा कारभार ते घरून हाताळत होते.
मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांना काही काळासाठी ICU मध्ये ठेवावं लागलं होतं. उपचारांमुळे त्यांची प्रकृती सुधारली आणि त्यांना घरी सोडण्यात आलं.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लॉकडाऊनमुळे ‘मामी’सह जगभरातले फिल्म फेस्टिव्हल युट्यूबवर एकत्र येणार