महाराष्ट्रात एका दिवसात 552 रुग्ण वाढले

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. अदानी समूह करणार धारावीचा पुनर्विकास, 5,069 कोटी लावून जिंकली बोली

  2. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  3. आजपासून देशात काय सुरू, काय बंद? - वाचा लॉकडाऊन नियमावली

  4. यापुढचे अपडेट्स पाहण्यासाठी...

    आजचा हा ब्लॉग इथेच थांबवत आहोत.

    यापुढचे ताजे अपडेट्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    काळजी घ्या.

    धन्यवाद.

  5. मुंब्रा पोलीस स्टेशन का होतोय कोरोनाचा हॉटस्पॉट?

  6. 20 एप्रिलपासून महाराष्ट्रात काय सुरु होणार?

  7. धारावीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 ने वाढला

    धारावी परिसरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये 20 ने वाढ झाली. त्यामुळे या परिसरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 138 इतकी झाली आहे. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

  8. सांगली कोरोनाग्रस्ताचा मृत्यू, पहिल्या मृत्यूची नोंद

    सांगलीत कोरोना व्हायरसमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा कोरोना व्हायरसचा सांगलीतील पहिला मृत्यू ठरला आहे.

    हा रुग्ण विजयनगरचा रहिवासी होता. मिरज सिव्हिल हॉस्पिटल इथं त्याच्यावर 17 एप्रिलपासून उपचार सुरू होते, या व्यक्तीच्या संपर्कातील 27 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. विजयनगर परिसर कंटेनमेंट झोन घोषित करून सीलबंद करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

  9. लॉकडाऊनच्या काळात दुकानदारांचं सहकार्य कौतुकास पात्र – नरेंद्र मोदी

    भविष्यातही दुकानं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सुरू व्हावेत, याची आपण काळजी घेतली पाहिजे. सध्याच्या संकटाच्या काळात सगळे दुकानदार आणि व्यापारी कौतुकास पात्र आहेत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

    छोट्या दुकानदारांनी समाजव्यवस्था सहज बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. समाज आणि देश या योगदानाला नेहमी लक्षात ठेवतील, असं मोदी म्हणाले.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  10. कोरोनाचा परिणाम महिला आणि पुरुषांवर वेगवेगळा का होतो?

  11. 4 मे पासून उड्डाणे सुरु करण्याचा निर्णय अद्याप नाही- नागरी उड्डाण मंत्रालय

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  12. नागपूरमध्ये आढळले कोरोनाचे 9 रुग्ण

    नागपूरमध्ये आज कोरोनाचे 8 नवे रुग्ण आढळले आहेत अशी माहिती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. कोरोना व्हायरस : फैलाव रोखण्यासाठी सर्वांनीच चेहऱ्यावर मास्क बांधावेत?

    निरोगी व्यक्तींनी मास्क बांधण्याची गरज नाही. कोरोना संशयितांची काळजी घेणारे किंवा ज्यांना खोकला आणि शिंका येत असतील, अशा लोकांनीच मास्कचा वापर करावा, अशा सूचना संघटनेकडून यापूर्वी देण्यात आलेल्या होत्या. मात्र, भारतात आता मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय.

    कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरावेत का, या प्रश्नाच्या उत्तरासाठी या बातमीवर क्लिक करा.

  14. देशात गेल्या 24 तासांत 1324 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण तर 31 जणांचा मृत्यू

    भारतात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसची लागण झालेले 1324 नवे रुग्ण आढळले. तर 31 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

    देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 16 हजार 116 वर पोहोचला आहे. त्यापैकी 2302 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 519 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 13 हजार 295 रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, असं मंत्रालयाने सांगितलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  15. आयसीएमआरच्या नियमावलीचे पालन करा, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंना विनंती

    आयसीएमआरच्या नियमावलीचे पालन करा, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  16. महाराष्ट्रात टोल वसुली पुन्हा सुरू

    महाराष्ट्रातील टोल वसुलीला देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आली असून, आज रात्री 12 वाजल्यापासून टोलवसुली सुरू केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं निर्णयाचं पत्रक जारी केलंय.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहनांवरील टोल वसुली 29 मार्चपासून थांबवण्यात आली होती. मात्र हा निर्णय आता मागे घेण्यात आला असून, नेहमीप्रमाणे टोलवसुली आज रात्रीपासून सुरू होईल.

  17. कोरोना व्हायरस: आनंदी ठेवण्याचे सोपे उपाय

    असं वाटतं की आता सगळं संपत चाललंय. सगळीकडं ताणतणावाचं वातावरण आहे. तरी यात एक आशेचा किरण नक्की असतो. तो शोधणं आणि त्याबाबत सकारात्मक विचार करणं महत्त्वाचं आहे. पण अशा झाकोळलेल्या वातावरणात आनंदी राहायचं म्हणजे काय करायचं?लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - कोरोना व्हायरसच्या काळात स्वतःला आनंदी कसं ठेवाल?

    smile

    फोटो स्रोत, Getty Images

  18. एकाच व्हेंटिलेटरमधून चार जणांना एकाचवेळी ऑक्सिजन, काश्मिरी तरुणाची शक्कल

    पाहा व्हीडिओ-

    व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस : काश्मीरमध्ये व्हेंटिलेटर्सच्या तुटवड्यावर तरुणांनी अशी केली मात
  19. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात कसे केले लग्न?

  20. कोव्हिड-19 पॉझिटिव्ह असल्याचं सांगत आत्महत्येचा प्रयत्न करणारा ताब्यात

    कोव्हिड-19 पॉझिटिव्ह असल्याचं सांगत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला दिल्लीत ताब्यात घेण्यात आलं.

    त्याला कोरोना व्हायरसची लागण झाली, असं सांगत या व्यक्तीने दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षारक्षकांवर तो थुंकत होता. तसंच हाताची नस कापून घेण्याची धमकी देत होता. पण अखेर त्याला वाचवण्यात यश आलं, असं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.