महाराष्ट्रात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत, राज्यात एकूण 1761 बाधित
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
यापुढील अपडेट्स वाचण्यासाठी
हे पेज आम्ही येथेच थांबवत आहोत. यापुढील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
हेच लॉकडाऊन 2005 मध्ये झालं असतं तर...?
कोरोनाचे रुग्णच वाचवणार इतर कोरोनाग्रस्तांचे प्राण?
महाराष्ट्राचा लॉकडाऊन प्लान - जिल्हे तीन झोन्समध्ये विभागले जाणार
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त आणि मृत्यूंची एकूण आकडेवारी -
1.मुंबई - 1146 मृत्यू 76
2.ठाणे 107 मृत्यू 06
3.नवी मुंबई मनपा 36 मृत्यू 02
4.पालघर 18 मृत्यू 04
5.रायगड(पनवेल) 07 मृत्यू 01
6. नाशिक 14 मृत्यू 02
7.अहमदनगर 26 मृत्यू 00
8.जळगाव 02 मृत्यू 01
9.पुणे 257 मृत्यू 27
10. सातारा 06 मृत्यू 01
11. कोल्हापूर 06 मृत्यू 00
12. सांगली 26 मृत्यू 00
13. सिंधुदूर्ग 01 मृत्यू 00
14. रत्नागिरी 05 मृत्यू 01
15. औरंगाबाद 19 मृत्यू 01
16. जालना 01 मृत्यू 00
17. हिंगोली 01 मृत्यू 00
18. लातूर 08 मृत्यू 00
19. उस्मानाबाद 04 मृत्यू 00
20. बीड 01 मृत्यू 00
21. अकोला 12 मृत्यू 00
22. अमरावती 04 मृत्यू 01
23. यवतमाळ 04 मृत्यू 00
24. बुलडाणा 13 मृत्यू 01
25. वाशिम 01 मृत्यू 00
26. नागपूर 25 मृत्यू 01
27. गोंदिया 01 मृत्यू 00
28. धुळे 01 मृत्यू 01
29. इतर राज्य 09 मृत्यू 00
महाराष्ट्रात 187 नव्या रुग्णांची नोंद, एकूण 1761 बाधित
महाराष्ट्रात आज 187 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण 1,761 बाधित असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. सोबतच 208 रुग्ण बरे झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अहमदाबादमध्ये अडकलेल्या ब्रिटिश नागरिकांसाठी विमानाची सोय
भारतात अडकलेल्या ब्रिटिश नागरिकांसाठी युके सरकारने ब्रिटिश एअरवेजचे विमान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 13, 15 आणि 17 एप्रिल या दिवशी हे विमान निघणार आहेत.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये अडकलेल्या युकेच्या नागरिकांना घेऊन हे विमान रवाना होतील. प्रत्येक विमानात सुमारे 280 प्रवासी असतील, अशी माहिती अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानातळाचे संचालक मनोज गांगल यांनी दिली आहे..
आजचा #CoronaPodcast
आज दिवसभरात नेमकं काय घडलं, हे सांगतायत आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड
भारतीय डॉक्टरांचं पथक कुवैतला रवाना
वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं एक पथक भारतातून कुवैतच्या दिशेने रवाना झालं. या पथकासोबत आवश्यक वैद्यकीय उपकरणेही पाठवण्यात आली आहेत. त्यांच्यातर्फे कुवैतमध्ये आवश्यक ते वैद्यकीय सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
कोरोना व्हायरसग्रस्तांवर उपचारासाठी भारताने इतर देशांना शक्य तितकी मदत करण्यात येईल, असा निर्णय घेतला होता. त्याचंच हे एक उदाहरण असल्याचं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
युकेमध्ये 24 तासांत 917 मृत्यू
कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे युकेमध्ये 917 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला, अशी माहिती तिथल्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
शनिवार 11 एप्रिलच्यासंध्याकाळपर्यंत युकेतील एकूण 78 हजार 991 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर त्यापैकी एकूण 9875 रुग्णांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ऑनलाईन घरपोच दारू विक्रीची परवानगी नाही
ऑनलाईन वाईन, लिकर या मथळ्याखाली घरपोच मद्य सेवा, अशा प्रकारच्या फेक मेसेजद्वारे समाजमाध्यमांवर फसव्या जाहिराती पसरवल्या जात आहेत.
राज्य शासनाकडून ऑनलाइन मद्य विक्रीची कुणालाही परवानगी नाही. नागरिकांनी अशा फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलं आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
महाराष्ट्राची पुढची वाटचाल कशी?
यापुढे महाराष्ट्राची वाटचाल कशी असेल, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यांनी मांडलेले मुख्य मुद्दे -
1. राज्यात आतापर्यंत 1652 कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत कोरोनाच्या 33 हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोना मृत्यूदर 5.5 टक्के आहे.
2. राज्यातील 70 टक्के कोरोनाचे रुग्णांना साधारण लक्षणं दिसत आहेत, तर 5 टक्के क्रिटिकल पेशंट आहेत.
3. राज्यात 3 प्रकारचे हॉस्पिटल असणार आहेत. त्यात एक म्हणजे कोव्हिड केअर सेंटर, ज्यात सौम्य लक्षणाचे पेशंट असतील, नंबर दोन म्हणजे कोविड हेल्थ सेंटर ज्यात माईल्ड सिम्पटम्सचे पेशंट असतील आणि कोविड हॉस्पिटलमध्ये फक्त तीव्र लक्षणं असलेले पेशंट असतील.
4. मोबाईल हॉस्पिटल आणि टेलिमेडिसीनच्या माध्यमातून कोरोनाव्यतिरिक्त जे रुग्ण आहेत, त्यांना औषधी पुरवण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसीन सुरू केली जाईल.
5. राज्यात पुरेसे व्हेंटिलेटर्स आणि N-95 मास्क, पीपीई किट्स उपलब्ध आहेत.
6. राज्यात कोरोनाअंतर्गत ग्रीन, रेड झोन तयार करण्याची गाईडलाईन दोन दिवसांत केंद्र सरकार जाहीर करेल. त्यानुसार पावलं टाकण्यात येईल.
मुंबईमध्ये 189 नवे रुग्ण, 11 मृत्यू
कोरोना व्हायरसची लागण झालेले 189 नवे रुग्ण मुंबईत आढळून आले. तर आज 11 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनानेदिली आहे.
यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1182 वर पोहोचली आहे. तर एकूण 75 व्यक्ती कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.
लॉकडाऊनचा काळ वाढल्यामुळे काय परिणाम होणार?
कोरोनापासून वाचण्यासाठी मी मास्क घालायचाच का?
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 28 हजार 256 कोटी रुपयांचं वाटप
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर हातावर पोट असणाऱ्या गरिबांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 28 हजार 256 कोटी रुपयांच्या निधीचं वाटप करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे.
ही रक्कम 30 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात आाल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे.
लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत - उद्धव ठाकरेंच्या भाषणातले 9 मुद्दे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याला उद्देशून भाषण करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते राज्यातल्या जनतेला संबोधित करत आहेत.
पाहा LIVE इथे -
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
गेल्या 24 तासात 1,035 रुग्ण वाढले, देशात एकूण 7447 बाधित
देशातील कोरोना व्हायरसबाधितांची संख्या गेल्या 24 तासात 1,035 ने वाढली असून कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 7,447 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसमुळे काल 40 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 239 वर पोहोचली आहे. तसंच व्हायरसची लागण झालेले एकूण 642 रुग्ण बरे झाल्याचं अगरवाल यांनी सांगितलं.
कोव्हिड-19च्या प्रसाराला सुरुवात झाल्यानंतर भारताने तातडीने प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत. देशात 25 मार्च पासून लोकडाऊन नसतं तर आजपर्यंत 2 लाख रुग्ण आढळले असते. त्यामुळे लोकडाऊन खूप महत्त्वाचे आहे.
सामूहिक संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. तसंच 586 हॉस्पिटलमध्ये सुमारे 1 लाख बेड आणि त्यापैकी 11,500 ICU बेड सध्या उपलब्ध आहेत. सध्या कंटेंनमेंट प्लॅनवर योग्य प्रकारे काम सुरू आहे, असं अगरवाल यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, ani