You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत आढळले 59 नवे रुग्ण, राज्यात आता एकूण 302 पॉझिटिव्ह
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे आणखी 72 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 302वर गेला आहे.
लाईव्ह कव्हरेज
'सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कापणार नाही, टप्प्याटप्प्याने देणार'
अनिल देशमुखांचा संभाजी भिडेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला
"फिट राहण्यासाठी तरुणांनी क्रीडांगणावर जायला हवं, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. मी ते नुकतंच ऐकलं. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन राज्य शासनाने सर्व नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचं काटेकोर पालन करावं. कारण यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे. सरकारच्या म्हणण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं," असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
मुंबईत आज अचानक 59 नवे रुग्ण कसे आढळले?
'कोणाचेही पगार कापणार नाही', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...
कोणाचेही पगार कापणार नाही, ते दोन टप्प्यात देणार आहोत. राज्यासह संपूर्ण देश संकटात आहे. आर्थिक घडी विस्कटू नये यासाठी अशी आर्थिक मांडणी करत आहोत.
आता ऋतूबदलाचा काळ आहे. उन्हाळा जवळ येत आहे. तेव्हा सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो, त्यामुळे अधिक काळजी घ्या. एसीचा वापर टाळा. फ्रीझमधलं थंड पाणी, थंड पेयं पिणं टाळा. कोमट पाणी प्या. हा कोरोनावरचा इलाज नाही, पण काळजी घेण्याचे उपाय आहेत. सर्दी-खोकल्याची लक्षणं दिसली तर तपासणी करून घ्या.
मजुरांचं स्थलांतर सुरू आहे. त्यांच्या जेवणाखाण्याची सोय करण्यात आली आहे. कोणीही कृपया कुठेही जाऊ नये. दोन-सव्वा दोन लाख मजुरांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे. त्याची चिंता करू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा. थोडी गैरसोय होऊ शकते परंतु ते आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
शिवभोजन थाळी दहाऐवजी पाच रुपयात देणार आहोत. शिवभोजन केंद्रांची क्षमता वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री LIVE
मुख्यमंत्री यांचं राज्याला उद्देशून भाषण सुरू आहे. पाहा इथे -
मुंबईत वाढले 59 रुग्ण
राज्यात सध्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 203 वरून एका झटक्यात 302 वर गेला आहे. यात सर्वाधिक 59 रुग्णांची नोंद ही एकट्या मुंबईत झाली आहे.
त्याखालोखाल, नगरमध्ये 3 तर पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये, नवी मुंबई आणि वाशी-विरारमध्ये प्रत्येकी दोन नवे रुग्ण आढळले आहेत.
दुपारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत, राज्यात आतापर्यंत 6,323 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून 5,911 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत, असं सांगितलं होतं.
काश्मीरमध्ये सहा नवे रुग्ण आढळले
जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आज सहा नवे रुग्ण आढळले असून, इथला एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 55 वर गेला आहे. यापैकी जम्मूमधले 12 आणि काश्मीरमध्ये 43 आहेत.
दिल्लीत दिवसभरात 3763 जण ताब्यात
दिल्लीत कोरोना व्हायरसचा लॉकडाऊन न पाळणाऱ्या 3763 जणांवर कारवाई केल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं असून, एकूण 200 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असंही पोलिसांनी सांगितलं.
कोरोनामुळे गरीब आता आणखीच गरीब होणार - जागतिक बँक
गृहमंत्री अनिल देशमुखांचं आवाहन
उद्या 1 एप्रिल अर्थात एप्रिल फूलनिमित्त कुठलीही अफवा पसरवू नका, अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक चुकीच्या पोस्ट्स सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. तो टाळण्यासाठी त्यांनी हे आवाहन केलं आहे.
'कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पीएम केअर हा वेगळा फंड कशाला?'
निजामुद्दीनच्या त्या कार्यक्रमात 1700 जण सहभागी झाले होते
दिल्लीतल्या निजामुद्दिन भागात तबलिगी जमातकडून आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात 1,500 ते 1,700 लोक सहभागी झाले होते, अशी माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे. यामध्ये काही कोरोना संक्रमित लोक सहभागी झाल्याचं बोललं जात आहे.
त्यानंतर इथे 400 संशयित रुग्ण सापडले आहेत. तर 24 पॉझिटिव्ह असल्यंच कळलं आहे.
"सध्या तबलिगी जमातच्या निजामुद्दीनमधल्या इमारतीमधून 1033 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यापैकी 334 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर 700 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे," असं सत्येंद्र जैन यांनी सांगितलं.
दिल्ली सरकारनं या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, कारण दिल्लीत सध्या आपत्ती आणि संसर्गजन्य आजार कायदा लागू आहे, ज्यानुसार 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. इथं या कायद्यांचं उल्लंघन झाल्याचं जैन यांनी म्हटलं आहे.
सेक्स आणि कोरोना व्हायरस विषयी तुमच्या मनातल्या 'त्या' 7 प्रश्नांची उत्तरं
कोरोनाचे आणखी 5 रुग्ण आढळले, संख्या 230 वर
महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 5 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत 4 आणि पुण्यात एकाची टेक्ट पॉझिटिव्ह आली आहे
महाराष्ट्रात आज 33 नवे रुग्ण आणि 3 मृत्युमुखी, देशात एकूण 38 बळी
मुंबईत आढळले 59 नवे रुग्ण, राज्यात आता एकूण 302 पॉझिटिव्ह
महाराष्ट्र्रात कोरोनाचे 225 रुग्ण
31 मार्चपर्यंत राज्यात कोरोनाचे 225 रुग्ण झाले आहेत. मुंबईत आणखी एक रुग्ण सापडला आहे. तर पुणे आणि बुलडाण्यात प्रत्येकी 2 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.