उत्तर-मध्य मुंबईत काँग्रेसकडून वर्षा गायकवाडांना उमेदवारी

सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक घडामोडी घडत आहे. या सर्व अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.

थोडक्यात

  • उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीरनामा प्रसिद्ध केला.
  • बिहारच्या पाटणा शहरात एका हॉटेलला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
  • नरेंद्र मोदी, राहुल गांधींविरोधातील तक्रारींची निवडणूक आयोगाने घेतली दखल
  • सरकारविरोधी निदर्शनं करण्याप्रकरणी इराणच्या रॅपरला मृत्युदंडाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
  • शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस्या जाहीरनाम्याची घोषणा, सत्तेत आल्यावर गरीब महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देणार
  • समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हे आज कन्नौज लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरणार आहेत
  • दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सला 4 रनांनी हरवले.

लाईव्ह कव्हरेज

  1. सॅम पित्रोडांच्या ज्या विधानाने गदारोळ झाला तो वारसा कर आहे काय? नेमका वाद काय?

  2. फक्त एकदा संसदेत गेलेल्या खासदाराची गोष्ट, निवडून आल्यानंतर प्रत्येकवेळी स्वतःहून द्यायचे राजीनामा

  3. शीख कट्टरतावादी नेता अमृतपाल सिंग लोकसभा लढवणार?

    सध्या आसामच्या तुरुंगात कैद असलेल्या अमृतपाल सिंगने आगामी लोकसभा निडवणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आसाममधील दिब्रुगड तुरुंगात बंद असलेला खलिस्तानी नेता आणि 'वारिस पंजाब दे' या संघटनेचा संस्थापक अमृतपाल सिंग पंजाबच्या खदूर साहिबमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

    मात्र, गुरुवारी(25 एप्रिलला) दिब्रूगड तुरुंगात अमृतपालला भेटण्यासाठी आलेले त्याचे वडील तरसेम सिंग आणि नातेवाईकांनी तो निवडणूक लढवणार असल्याची पुष्टी केलेली नाही.

    अमृतपालचे नातेवाईक

    फोटो स्रोत, Dalip Sharma

    अमृतपाल सिंगचे वडील आणि त्यांचे काका सुखचैन सिंग यांनी दिब्रुगड तुरुंगाबाहेर पत्रकारांना सांगितलं की, तुरुंग अधिकाऱ्यांमुळे आज अमृतपाल सिंग यांच्याशी निवडणुकीच्या मुद्द्यावर योग्य चर्चा होऊ शकली नाही.

    दिब्रुगड मध्यवर्ती कारागृह अधिकाऱ्यांच्या या सक्तीबाबत उद्या दिब्रुगड जिल्हा आयुक्तांची भेट घेणार असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. यापूर्वी अमृतपालचे वकील राजदेव सिंग खालसा यांनी अमृतपाल निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली होती. याविषयी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अमृतपालने लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

  4. उत्तर-मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा

    वर्षा गायकवाड

    फोटो स्रोत, FACEBOOK/VARSHAGAIKWAD

    उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून अखेर महाविकास आघाडीने काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने एक पत्रक काढून वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

    महत्त्वाची बाब म्हणजे उत्तर मध्य मतदारसंघातून 2004 साली वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी निवडणूक लढवली होती ते जिंकले होते. पण त्यावेळी धारावीचा भाग उत्तर-मध्य मुंबईमध्ये येत होता.

    पत्रक

    फोटो स्रोत, AICC

    भाजपने या जागेवर अजूनही त्यांचा उमेदवार जाहीर केला नाही. 2014 आणि 2019 साली भाजपाच्या पूनम महाजन यांनी सलग दोनवेळा या मतदारसंघातून खासदार म्हणून विजय मिळवला आहे.

    काँग्रेसकडून या मतदारसंघात वेगवेगळी नावं चर्चेत होती. पण आज अखेर वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हा लोकसभा मतदारसंघ जाती-धर्मांच्या अंगानं आणि आर्थिक वर्गानुसारही मिश्र वस्ती असलेला आहे.

  5. उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात, शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रकाशित

    उद्धव ठाकरे

    फोटो स्रोत, Getty Images

    "भाजपची अवस्था विचित्र झाली आहे. भाजपला पराभव समोर दिसायला लागल्यानंतर ते आता राम राम म्हणायला लागले आहेत. सुरुवातीचे काही वर्षं ठीक होतं, पण नंतर तशी परिस्थिती राहिली नाही. भाजपची पाशवी बहुमत मिळवण्याची इच्छा आता हळूहळू उघड होऊ लागली आहे," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

    उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी ते बोलत होते.

    "काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा सादर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनीही जाहीरनामा जाहीर केला आहे. मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की आवश्यकता असेल तरच आम्ही वचननामा जाहीर करू. त्यानुसार आम्ही आता आमचा वचननामा प्रकाशित करत आहोत," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

    ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यात काय आहे?

    शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्रातील उद्योग, क्रिकेटची मॅच, हिरे बाजार सगळं काही पळवलं जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात जे महाराष्ट्राचं वैभव वाढत होतं ते आम्ही पूर्ववत करणार आहोत.

    आता इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात येईल आणि काही महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येईल. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक राज्याचा सन्मान ठेवला जाईल. महाराष्ट्रातील वित्तीय केंद्रे आम्ही नव्याने उभी करू. शहरांसोबतच ग्रामीण भागात नोकरीच्या संधी आम्ही निर्माण करू."

    आरोग्य व्यवस्थेबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, "कोरोनाकाळात आम्हाला आरोग्य व्यवस्थेतील उणिवा जाणवल्या. त्यानुसार जिल्हा रूग्णालयांचं आधुनिकीकरण करू.

    प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा वाढवू. इंडिया आघाडीचं सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहे. महाराष्ट्रात आम्ही शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्त करून थांबणार नाही तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिकविम्याचे निकष बदलून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळाली पाहिजे यावर आम्ही विशेष लक्ष देऊ.

    शेतकऱ्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्यात खतं आणि शेतीची उपकरणं असतात, त्या सगळ्या गोष्टी आम्ही जीएसटीमुक्त करू. शेतकऱ्यांसाठी गोदामं बांधली जातील,

    जिथे गरज आहे तिथे शीतगृहं बांधली जातील. शेतकऱ्याला बाजाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी खात्याच्या अंतर्गत एक संशोधन आणि सर्वेक्षण केंद्र उभं करण्यात येईल. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील.

  6. बिहारच्या पाटणा शहरात हॉटेलला आग लागून सहा जणांचा मृत्यू

    पाटणा शहरात लागलेली आग

    फोटो स्रोत, ANI

    बिहारच्या पाटणा शहरात एका हॉटेलला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पाटण्यातील गोलबार कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतल्या एका हॉटेलला हे आग लागली.

    मृतांमध्ये तीन महिला आहेत. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक चंद्रशेखर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

    या आगीत 12 जणांना वाचवण्यात आलं असून त्यांना पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींवर उपचार सुरू आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    बिहारमधील अग्निशमन विभागाच्या अधिकारी शोभा अहोटकर यांनी सांगितलं की, हा अपघात गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झाला असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे.

    त्यांनी सांगितलं की त्यांचा विभाग अशा भागात सातत्याने फायर ऑडिट करत आहे. अशा अपघातांपासून लोकांना वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने जनजागृती मोहीम राबवत आहोत.

  7. लहान मुलांमध्ये डोळ्यांचे कोणते आजार आढळतात? त्यांची लक्षणं काय आहेत? महत्त्वाची माहिती

  8. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'शहजाद्याची एक्स-रे मशीन...'

    नरेंद्र मोदी

    फोटो स्रोत, Getty Images

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्र्यात झालेल्या सभेत काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर सडकून टीका केली आहे.

    आग्राच्या सभेत पंतप्रधान म्हणाले की, "जर काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इंडी आघाडीचं सरकार आलं तर तुमच्या संपत्तीची तपासणी केली जाईल. काँग्रेसच्या राजकुमाराची एक्स-रे मशीन आय बहिणींच्या कपाटापर्यंत पोहोचेल.

    एखाद्या गरीब आईने जर तिच्याजवळच्या ज्वारी-बाजरीच्या डब्यात सांभाळून काही पैसे ठेवले असतील तर तिथेही ही एक्स-रे मशीन पोहोचेल. त्या डब्यात असलेले दागिने काँग्रेस आणि समाजवादीचं सरकार काढून घेऊन जाईल."

    मोदी म्हणाले की, "मी हे बोलत नाहीये, त्यांचे दिग्गज नेते बोलले आहेत. शहजादे(राजकुमार) बोलले आहेत. इथे उपस्थित असलेल्या माता-भगिनींनी सांगावं, त्या त्यांचं सोनं इतर कुणाला देतील का? त्या जीव देतील पण मंगळसूत्राला हात लावू देणार नाहीत. हे यांना माहीत नाहीये."

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वारसा कराच्या विधानावर टीका करताना मोदी म्हणाले की, "आता काँग्रेस-सपा युती म्हणते की ते तुमचा वारसाही लुटतील. म्हणजेच तुमच्या आजी-आजोबा आणि आई-वडिलांनी मेहनत करून जे कमवलं आहे ते ताब्यात घेतील. वारशात मिळणाऱ्या 55 टक्क्यांहून अधिक मालमत्तेवर ते जप्ती आणतील."

    ते म्हणाले की , "तुम्ही तुमच्या आई-वडिलांची मेहनत त्यांना लुटू देणार का? आज तुम्ही जी संपत्ती भावी पिढ्यांसाठी जोडत आहात, त्यावर निम्म्याहून अधिक कर लादून या लोकांना लुटायचे आहे.

    समजा तुमचं चार खोल्यांचं घर असेल तर तुमच्या मुलाला दोनच खोल्या मिळतील. दोन खोल्या काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं सरकार घेऊन जाईल."

  9. नरेंद्र मोदी, राहुल गांधींविरोधातील तक्रारींची निवडणूक आयोगाने घेतली दखल

    राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून झालेल्या आदर्श आचारसंहिता उल्लंघन प्रकरणाची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे.

    निवडणुकीच्या प्रचारादम्यान या दोन्ही नेत्यांनी सभांमध्ये धर्म, जात, समुदाय किंवा भाषेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या तक्रारी भाजप आणि काँग्रेसकडून करण्यात आल्या होत्या.

    त्या तक्रारींची दखल घेऊन निवडणूक आयोगानं या प्रकरणी 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत दोन्ही पक्षांकडून उत्तर मागवलं आहे.

    राजकीय पक्षांना त्यांच्या नेत्यांच्या आणि प्रामुख्यानं स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक जबाबदारी स्वीकारावी लागेल, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

    राहुल गांधी गरीबी वाढल्याचे खोटे दावे करत असल्याची तक्रार भाजपनं केली होती. तसंच देशातील उत्तर आणि दक्षिण भागांतील लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम राहुल गांधी करत असल्याची तक्रारही भाजपनं केली होती.

    तर देशातील विविध वर्गातील नागरिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असलेल्या उमेदवारांवर कारवाई करणं हा एकमेव पर्याय असल्याचं काँग्रेसनं मोदींविरोधातील तक्रारीनंतर म्हटलं होतं.

  10. छत्तीसगडच्या कांकेरमध्ये 29 माओवाद्यांच्या मृत्यूनंतर संघर्ष आणखी तीव्र होणार का? ग्राऊंड रिपोर्ट

  11. 570 रुपयांच्या वीजबिलासाठी कर्मचारी महिलेची निर्घृण हत्या

    जास्त बिल आल्याच्या रागातून एका तरुणानं बुधवारी बारामती तालुक्यातील मोरगावमध्ये 34 वर्षीय वीज कर्मचारी महिलेची हत्या केली. मूळच्या लातूर शहरातील रिंकू गोविंदराव बनसोडे 10 वर्षापूर्वी महावितरणच्या सेवेत दाखल झाल्या होत्या.

    मोरगावमध्येच त्या 10 वर्षांपासून कार्यरत होत्या. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे.

    दहा दिवसांच्या सुटीनंतर रिंकू या बुधवारी 24 तारखेला मोरगाव कार्यालयात कामावर पुन्हा रुजू झाल्या होत्या. त्यावेळी 26 वर्षीय अभिजित पोटे हा 26 वर्षीय तरुण कार्यालयात आला. त्यानं रिंकू यांना जास्त बिल आल्याचा जाब विचारला.

    त्यानंतर काहीही समजून घेण्याच्या आधीच त्यानं रिंकू यांच्यावर वार केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. मोरगावमध्ये प्रथमोपचारानंतर त्यांना तातडीनं पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

    पण, दुर्दैवानं उपचारादरम्यान दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

    अभिजित यांना दर महिन्यापेक्षा काही युनिट जास्त बिल आलं होतं. कुठलीही थकबाकी नव्हती. 570 रुपये एवढं बिल आलेलं होतं. अभिजित हा मजुरी करायचा आणि काही महिन्यांपासून घरीच होता. या घटनेनंतर अभिजीतला अटक करण्यात आली आहे.

    रिंकू बनसोडे
  12. बिहारमध्ये जेडीयू नेत्याची गोळ्या घालून हत्या, पोलीस काय म्हणाले?

    कन्हैया सिंह

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, एसडीपीओ कन्हैया सिंह

    बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल (संयुक्त) चे नेते सौरभ कुमार यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

    पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सौरभ कुमार बुधवारी रात्री उशिरा एका लग्न सोहळ्यातून परतत होते. त्यावेळी पाटण्याच्या जवळ पुनपुन परिसरात अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

    उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) कन्हैय्या सिंह यांनी याबाबत एएनआय वृत्तसंस्थेला माहिती दिली.

    "सौरभ कुमार त्यांच्या मित्रांबरोबर एका कार्यक्रमात गेले होते. तिथून परतत असताना रात्री 12.15 वाजता मोटारसायकवरून आलेल्या काही अज्ञातांनी त्यांना गोळ्या घातल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यांच्याबरोबर मुनमुन कुमार हेदेखिल जखमी झाले आहेत. त्यांना कंकडबाग रुग्णालयात नेण्यात आलं."

    X पोस्टवरून पुढे जा, 1
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 1

    जेडीयू नेते अभिषेक झा यांनी हा प्रकार दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचं म्हटलं आहे.

    "संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होत आहे. या हत्येमागं कोणीही असलं तरी कठोर कारवाई केली जाईल. त्यांची जागा तुरुंगातच असेल. नितीश कुमार यांच्या कार्यकाळात अशा घटनांनंतर वाचणं शक्य आहे, असा विचार कोणी करत असेल, तर ते शक्य नाही," असं त्यांनी म्हटलं.

    X पोस्टवरून पुढे जा, 2
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 2

    बिहार काँग्रेस अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    राजकीय कार्यकर्त्यांची हत्या निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले. "सरकारनं लगेचच या प्रकरणी कारवाई करावी. सत्याचा शोध लावून दोषींना कठोर शिक्षा दयावी," असं ते म्हणाले.

    X पोस्टवरून पुढे जा, 3
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 3

  13. अमेरिकेने युक्रेनला मदत करण्यासाठी गुप्तपणे पुरवली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे

    प्रतिकात्मक

    फोटो स्रोत, REUTERS

    रशियाच्या सुरक्षादलांचा सामना करण्यासाठी युक्रेननं अमेरिकेकडून गुप्तपणे घेतलेल्या लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक मिसाइलचा वापर सुरू केला आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.

    ही शस्त्रं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मार्चमध्ये युक्रेनला देऊ केलेल्या 30 कोटी डॉलरच्या मदतीचा भाग असून, या महिन्यात ती युक्रेनला पोहोचायला सुरुवात झाली आहे.

    अमेरिकेतील माध्यमांच्या रिपोर्टनुसार याचा वापर रशियाच्या ताब्यातील क्रिमियामध्ये त्यांच्या तळावंर हल्ला करण्यासाठी करण्यातही आला आहे.

    बायडेन यांनी आता युक्रेनला 61 अब्ज डॉलरचं मदत पॅकेज देण्यासही मंजुरी दिली आहे.

    अमेरिकेनं आधी युक्रेनला आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टिम्स (एटीएसीएमएस) च्या मध्यम पल्ल्याची शस्त्रं दिली आहेत. पण युक्रेनला मोठी शस्त्रं देणं त्यांनी आतापर्यंत टाळलं होतं.

    पण आता बायडेन यांनी फेब्रुवारीमध्ये गुप्तपणे लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रं युक्रेनला देण्याच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखवली असल्याचं म्हटलं जात आहे. ही क्षेपणास्त्रं 300 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतात.

    अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी याला दुजोरा दिला. "अमेरिकेनं यूक्रेनला राष्ट्राध्यक्षांच्या निर्देशांनुसार लांब पल्ल्याच्या एटीएसीएमएस पुरवठा केल्या होत्या. अमेरिकेनं याची माहिती युक्रेनच्या सांगण्यावरून सार्वजनिक केली नव्हती," असं ते म्हणाले.

    किती शस्त्रं पाठवली हे अद्याप स्पष्ट नाही. पण अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी वॉशिंग्टन युक्रेनला आणखी शस्त्रं पाठवण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं आहे.

  14. शरद पवार गटाचा जाहीरनामा, गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार

    शरद पवार

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा बुधवारी जाहीर करण्यात आला. शरद पवारांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आलेल्या या जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव देण्यात आलं आहे.

    शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जाहीरनाम्यात महागाई, महिला आरक्षण, जातनिहाय जनगणना, शिक्षण, पर्यटन आणि रोजगार अशा विषयांवर जोर देण्यात आला आहे.

    महागाईच्या मुद्द्याचा विचार करता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर मर्यादा आणण्यात आश्वासन यात देण्यात आलं आहे. तसंच स्वयंकापाच्या गॅसचे दर 500 रुपयांपर्यंत ठेवण्यासाठी केंद्र सरकारची सबसिडी देण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे.

    रोजगाराच्या बाबतीत रिक्त असलेल्या केंद्र सरकारमधील जवळपास 30 लाख जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. तसंच डिग्री आणि डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना साडेआठ हजार शिष्यवृत्ती देण्याचं आश्वासनही दिलं आहे.

    महिला आणि मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करून शासकीय नोकरीत महिलांना 50 टक्के आरक्षणाचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसंच शाळा कॉलेजांत महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर लक्ष देणार असल्याचंही म्हटलं आहे. तसंच गरीब महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देण्याचं आश्वासनही दिलं आहे.

    जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्याचाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या या शपथनाम्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा दूर करण्यासाठी विशेष कायदा करण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे.

  15. नमस्कार

    सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक घडामोडी घडत आहे. या सर्व अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.

    काल दिवसभरातील अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.