You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

एचडी रेवन्नांच्या पत्नीची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली

थोडक्यात

  • लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे.
  • सलमान खानवर आणखी एका हल्ल्याच्या कट उघड, चौघांना अटक केल्याचा पोलिसांचा दावा
  • फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी चीनला दक्षिण चीन सागरात आपली सीमा ओलांडू नये असं सांगितलं आहे.
  • बायडेन यांनी जाहीर केला गाझातील युद्ध थांबवण्यासाठीचा इस्रायलचा प्रस्ताव
  • हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रनोतनं हिमाचल प्रदेशात मोदींची लाट असल्याचं म्हटलं आहे.
  • पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे.
  • देशीतील 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात यावेळी इंडिया आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.
  • सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाची मुदत वाढवून देण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांना 2 जूनला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागणार आहे.

लाईव्ह कव्हरेज

नितीन सुलताने

  1. एक्झिट पोल कसे केले जातात? यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्यांचे अंदाज किती सटिक ठरले?

  2. मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

  3. एचडी रेवन्नांच्या पत्नीची अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळली

    नियुक्त प्रतिनिधींच्या विशेष न्यायालयानं महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात एचडी रेवण्णाची पत्नी भवानी रेवण्णा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

    घरातील मोलकरणीच्या अपहरणाच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी एसआयटीनं भवानी रेवण्णा यांना नोटीस पाठवली होती. मोलकरणीनं एचडी रेवण्णावर लैंगिक शोषण करण्याचा आणि प्रज्वल रेवण्णावर बलात्कार करण्याचा आरोप केला होता.

    या चौकशीच्या आधीच भवानी रेवण्णा यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळताना म्हटलं आहे की अपहरणाच्या प्रकरणात गुन्हेगारी कट करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

    न्यायालयानं एसआयटीला त्यांचा तपास सुरू ठेवण्यास सांगितलं आहे. गुरुवारी रात्री प्रज्वल रेवण्णा जर्मनीतून भारतात येताच त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना 6 जून पर्यत एसआयटीच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

    एसआयटीनं प्रज्वल रेवण्णाच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र प्रज्वल रेवण्णाच्या वकीलानं सांगितलं की एक दिवसाचीच कोठडी पुरेशी ठरेल कारण बहुतांश तपास पूर्ण झाला आहे. मात्र न्यायालयानं त्यांना सहा दिवसांची कोठडी दिली आहे.

  4. पहाटेपासून रांगा, तरीही दोन पाकिटं बियाणं; नको असलेले वाण घ्यायला लावत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

  5. उष्णतेच्या लाटेमुळे बिहारमध्ये 10 निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू

    बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 10 जण निवडणूक कर्मचारी होते.

    बिहार सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जरी केलेल्या एका निवेदनानुसार मृत्यू झालेल्या 14 लोकांपैकी 5 भोजपूर जिल्ह्यात निवडणूक कर्तव्य बजावत होते.

    रोहतासमध्ये 3 जण निवडणुकीचं काम करत होते तर कैमूर आणि बिहारच्या औरंगाबादमध्ये निवडणुकीसाठी नियुक्त केल्या गेलेल्या एका व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे.

    याशिवाय मरण पावलेले इतर चार जण औरंगाबाद जिल्ह्यातील होते.

    मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. उत्तर आणि मध्य भारतात खूप मोठी उष्णतेची लाट आलेली आहे. याआधी बिहारमधील एका शाळेचा व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये मुले उष्णतेमुळे बेशुद्ध होत होते.

    अनेक मुलांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. यानंतर बिहारमधील शाळा 8 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  6. मध्य रेल्वेच्या 63 तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, मुंबईकर म्हणतात

  7. महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसात कुठे कुठे पाऊस पडणार? काय आहे अंदाज?

    30 मे रोजी मान्सून केरळ आणि ईशान्येकडील राज्यांत दाखल झाला असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे.

    त्यामुळे आता महाराष्ट्रात राहणाऱ्यांनाही मान्सूनची चाहूल लागू लागली आहे. हवामान विभागाने पुढच्या दोन दिवसांचा अंदाज जाहीर केला असून त्यानुसार महाराष्ट्रात 31 मे आणि 1 जूनला कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

    विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 2 जूननंतर दक्षिण कोकणात तर 3 जूनला पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत पूर्वमोसमी सरी बरसतील. इथे गडगडाटी वादळासह विजा आणि पावसाची शक्यता आहे.

    आज (31 मे) ब्रह्मपुरी येथे 46.9°C कमाल तापमानाची नोंद झाली, तर सातारा येथे 24.1°C हे सर्वात कमी किमान तापमान होते.

    मान्सूननं केरळचा जवळपास संपूर्ण भाग आणि ईशान्येकडील सर्व राज्यांत म्हणजे मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, ही राज्ये व्यापली आहेत. तसंच मेघालय, आसाम लक्षद्वीपमध्येही मान्सूननं पदार्पण केलं आहे.

  8. विमानाच्या उड्डाणाला 20 तास उशीर, एअर इंडियाला नागरी उड्डाण मंत्रालयाची नोटीस

    दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानाला तब्बल 20 तास उशीर झाल्याने विमान वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

    मंत्रालयाने बजावलेल्या या नोटीसमध्ये ज्या प्रवाशांच्या विमानाला उशीर झाला त्यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा का निर्माण केल्या नाहीत याबाबत जाब विचारण्यात आला आहे.

    कडाक्याच्या उन्हात तापमान 50 अंशांवर पोहोचत असताना विमान कंपनीने लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी आवश्यक पावले का उचलली नाहीत? हा प्रश्नही उड्डाण मंत्रालयाने एअर इंडियाला विचारला आहे.

    24 मे आणि 30 मे रोजीच्या दोन विमानांबाबत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. फ्लाइट क्रमांक AI-179 AI-183 असे या दोन विमानांचे नंबर आहेत.

    या नोटीसमध्ये असं लिहिलं आहे की, “विमान वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे कारवाई का केली जाऊ नये याबाबत एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आह. ही नोटीस जारी झाल्याच्या तीन दिवसांमध्ये एअर इंडियाने उत्तर देणं अपेक्षित आहे. असं न केल्यास या प्रकरणावर एकतर्फी कारवाई केली जाईल.”

  9. तुरुंगात परत जाण्यापूर्वी अरविंद केजरीवालांनी दिल्लीकरांना म्हटलं, की...

    सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 दिवसांसाठी जामीन मंजूर केला होता. मद्य धोरणप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली होती.

    निवडणूक प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला होता आणि आता या 21 दिवसांच्या जमिनीची मुदत 1 जूनला संपणार आहे.

    त्यामुळे 2 जून रोजी त्यांना तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागणार आहे. त्याआधी त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिल्लीतील जनतेशी संवाद साधला.

    केजरीवाल यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण देत जामिनाची मुदत वाढवून मागितली होती पण सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनेच केजरीवाल यांचा हा अर्ज फेटाळून लावला.

    दिल्लीच्या जनतेला उद्देशून तयार करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये केजरीवाल म्हणाले की, "मी आता पुन्हा तुरुंगात जाणार आहे. मला माहीत नाही यावेळी ते मला किती दिवस, किती महिने तुरुंगात ठेवतील.

    देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तुरुंगात जातोय याचा मला अभिमान आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाची मुदत संपल्यामुळे आता मला पुन्हा तुरुंगात सरेंडर व्हावं लागणार आहे."

    केजरीवाल म्हणाले की, "हे यावेळी मला आणखीन त्रास देतील. तुम्ही सगळे स्वतःची काळजी घ्या. मी कुठेही असलो, तुरुंगात असलो, बाहेर असलो तरी दिल्लीकरांचं एकही काम मी थांबू देणार नाही.

    मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक, महिलांसाठी मोफत बससेवा या सुविधा जशा सुरु होत्या तशाच सुरु राहतील. मी तुरुंगातील बाहेर आल्यानंतर प्रत्येक महिलेला महिन्याला हजार रुपये देण्याची योजनाही सुरु करेन.

    मी नेहमी तुमच्या कुटुंबाचा मुलगा म्हणून माझं कर्तव्य पार पाडलं आहे. आज मी माझ्या कुटुंबासाठी तुमच्याकडे काही मागत आहे. माझ्या आई वडिलांचं वय झालं आहे. माझी आई सतत आजारी असते, मला तुरुंगात त्यांची खूप काळजी वाटते.

    मी तुरुंगात गेल्यावर माझ्या आई वडिलांची काळजी घ्या. देश वाचवताना माझा जीव जरी गेला तरी चिंता करू नका. तुमच्या प्रार्थनांमुळेच आज मी जिवंत आहे. शेवटी एवढंच म्हणेन की देवाची इच्छा असेल तर तुमचा हा मुलगा लवकरच तुरुंगातून परत येईल."

    डॉक्टरांनी मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं असं म्हटलं आहे स्वतःच्या प्रकृतीबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, “तुरुंगात मी 50 दिवस होतो. या 50 दिवसांत माझं 6 किलोने वजन कमी झालंय.

    तुरुंगात गेलो तेव्हा माझं वजन 70 किलो होतं. आता 64 किलो आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही वजन वाढलं नाही. डॉक्टर म्हणाले की शरीरातील मोठ्या आजाराचं हे लक्षण आहे. त्यासाठी काही चाचण्या करण्याची गरज आहे. माझ्या युरिनमध्ये किटोन पातळी वाढली आहे.”

    केजरीवाल १० मे रोजी जामिनावर बाहेर आले होते.

    सशर्त जामिनावर न्यायालयाने काय म्हटलं होतं?

    कोर्टाने आपल्या आदेशात सांगितलं होतं की, "लोकसभा निवडणूक ही दर पाच वर्षांनी होणारी एक महत्त्वाची घटना आहे. अरविंद केजरीवाल यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आणि ते 'समाजासाठी धोका' नाहीत."

    न्यायालयाने काही अटींसह जामीन देण्याचे आदेश दिले होते. केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाहीत, असं आदेशात सांगितलेलं होतं. तसेच ते कोणत्याही आदेशावर सही करणार नाहीत, दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरयांना एखादा आदेश द्यायचा असल्यास त्यावर केजरीवाल यांच्या स्वाक्षरीची गरज असणार नाही.

    केजरीवाल आपल्या विरोधात चालू असलेल्या सध्याच्या खटल्याबाबत कोणतेही वक्तव्य करणार नाहीत आणि या खटल्याशी संबंधित साक्षीदारांशी बोलणार नाहीत.

    मात्र, केजरीवाल त्यांचा राजकीय प्रचार करू शकतात.

    लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी उद्या म्हणजेच 1 जून रोजी मतदान होत असून न्यायालयाच्या आदेशानुसार अरविंद केजरीवाल यांना शरणागती पत्करावी लागणार आहे.

  10. वाढत्या शहरीकरणामुळे तापमान वाढत चाललंय का?

  11. मीडिया ट्रायल थांबवा, अटकेनंतर प्रज्वल रेवण्णांची न्यायालयात विनंती

    लैंगिक छळ प्रकरणी गुरुवारी रात्री अटक करण्यात आलेल्या प्रज्वल रेवण्णा यांनी कोर्टाकडं मीडिया ट्रायल थांबवण्याची मागणी केली आहे.

    वैद्यकीय तपासणीनंतर शुक्रवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.

    तपासासाठी स्थापन केलेल्या एसआयटीला सहकार्य करत असल्याचं यावेळी प्रज्वल यांनी सांगितलं.

    'ते तपासात सहकार्य करतील पण मीडिया ट्रायल थांबायला हवी,'असं बेंगळुरूमधील सीआयडी मुख्यालयात उपस्थित असलेल्या रेवण्णा यांच्या वकिलांनी म्हटलं.

    “प्रज्वल तपासात सहकार्य करण्यासाठीच समोर आले आहेत. पण मीडिया ट्रायल होऊ नये, अशी त्यांची माध्यमांना विनंती आहे," असं वकील म्हटलं.

    भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि कर्नाटकातील हासन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रज्वल रेवण्णा त्यांच्या मतदारसंघातील मतदानाच्या दुसऱ्या दिवशी डिप्लोमॅटिक व्हिसावर जर्मनीला गेले होते.

    मतदानाच्या चार दिवस आधी सार्वजनिक ठिकाणी त्याच्याशी संबंधित अश्लिल व्हिडिओ असलेले पेनड्राईव्ह सापडल्यानंतर त्यांच्या तपास आणि अटकेची मागणी वाढली होती.

  12. महाराष्ट्र पाणी टंचाई: उजनी धरणाच्या पायथ्याजवळची गावंच तहानलेली

  13. वाढत्या कर्जामुळं आणखी वाढणार पाकिस्तानच्या अडचणी

    गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. जास्त कर्ज असल्यामुळं पाकिस्तानच्या बजेटवर दबाव येत असल्याचं पाहायला मिळतं. पाकिस्तानवरील वाढत्या कर्जाबाबत त्याठिकाणचं चर्चित इंग्रजी वृत्तपत्र डॉननं संपादकीय लिहिलं आहे.

    या संपादकीयमध्ये काय म्हटलं आहे ते पाहुया -

    सरकारची महसुली तूट गेल्या पाच वर्षांमध्ये आर्थिक उत्पादनाच्या सरासरी 7.3 टक्के राहिली. ती खूप जास्त आहे.

    पाकिस्तानवर सुमारे 78.9 लाख कोटी पाकिस्तानी रुपयांचं कर्ज आहे. त्यात 43.4 कोटी पाकिस्तानी रुपयांचं घरगुती कर्ज आणि 32.9 लाख कोटींच्या बाह्यकर्जाचा समावेश आहे.

    पाकिस्तान अत्यंत वाईट पद्धतीनं या कर्जाच्या जाळ्यात अडकला आहे. पाकिस्तानला त्यांची जुनी कर्ज फेडण्यासाठी आणखी कर्ज घ्यावी लागतील. त्यामुळं पाकिस्तानच्या वार्षिक कर्जफेडीचं प्रमाणही जास्त असेल.

    उदाहरण द्यायचं झाल्यास अधिकाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षासाठी कर्जफेडीची रक्कम वाढवून 7.3 लाख कोटी पाकिस्तानी रुपये होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.

    पण त्यांनी आता यात बदल करून हा अंदाज वाढवून 8.3 लाख कोटी पाकिस्तानी रुपये केला आहे.

    अर्थमंत्रालयाच्या गेल्या वर्षासाठीच्या सहामाही आढावा अहवालात या चिंतांना दुजोरा मिळाला आहे.

    डिसेंबरच्या पहिल्या सहा महिन्यांदरम्यान देशातील कर्ज फेडीचं प्रमाण 64 टक्क्यांनी वाढून 4.2 लाख कोटी पाकिस्तानी रुपये झाल्याचं रिपोर्टवरून लक्षात येतं.

    या वाढीसाठी फक्त महसुली तोटा भरून काढण्यासाठीच्या कर्जाचा बोजाच नव्हे तर तर घरगुती कर्जासाठीचा 22 टक्के विक्रमी व्याजदरही जबाबदार ठरला.

    या रिपोर्टनुसार गेल्या सहा महिन्यांत फक्त कर्ज फेडण्यासाठी जेवढा खर्च करण्यात आला आहे, तो करातील वाढीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळं विकासावर एक रुपयाही खर्च होऊ शकला नाही.

  14. विदर्भात आजही उष्णतेची लाट, उद्यापासून पूर्व विदर्भात पावसाचा अलर्ट

    उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रातील विदर्भातही उष्णतेच्या लाटेचा परिणाम पाहायला मिळत आहे. जवळपास आठ ते दहा दिवसांपासून विदर्भ उन्हात होरपळून निघत असल्याचं पाहायला मिळत आहे.

    उष्णतेच्या लाटेमुळं विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांचया जवळ पोहोचल्याचं पाहायला मिळालं.

    31 मे रोजीही विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दोन्ही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे.

    त्यानंतर 1 जूनपासून मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भात पूर्व मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

    प्रामुख्यानं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    त्याशिवाय 2 जूनलाही विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  15. लोकसभा निवडणूक निकाल ठरवतील 'या' नेत्यांचं राजकीय भवितव्य; ठाकरे, पवार, फडणवीस, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला - विश्लेषण

  16. कुणाकुणाचं राजकारण पणाला? या 5 नेत्यांचं भवितव्य ठरवणार ही लोकसभा निवडणूक

  17. अग्निकुल कॉसमॉसच्या अग्निबाणची यशस्वी चाचणी

    स्पेस स्टार्टअप अग्निकुल कॉसमॉस ने त्यांच्या पहिल्या सिंगल स्टेज रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली. त्यांच्या अग्निबाण या रॅाकेटनं श्रीहरीकोटा इथल्या धनुष लॅान्चपॅडवरून 30 मे रोजी सकाळी 7.15 वाजता उड्डाण केलं.

    अग्निबाण SOrTeD (सब-ऑर्बिटल टेक्नोलॉजी डेमॉन्स्ट्रेटर) नावाची ही मोहीम म्हणजे एक सब ऑर्बिटल फ्लाइट होती. सब-ऑर्बिटल म्हणजे साधारण पृथ्वीच्या वर 100 किलोमीटरवर अंतराळात यान जातं, पण के पृथ्वीला प्रदक्षिणा न घालता माघारी फिरतं.

    अग्निबाण SOrTeD हे केवळ 6.2 मीटर उंचीचं रॅाकेट (लॅान्च वेहिकल) केवळ 2 मिनिटांत उड्डाण करून खाली आलं आणि ठरल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात पडलं. हे उड्डाण याआधी चारवेळा रद्द करावे लागलं होतं, पण यावेळी मात्र मोहीम यशस्वी झाली आहे. त्याबद्दल इस्रोनं अग्निकुलचं अभिनंदन केलं आहे. ही मोहीम देशांतल्या अनेक अर्थानं महत्त्वाची आहे. -

    धनुष या भारताच्या पहिल्या खासगी लॅान्चपॅडवरून हे रॅाकेट आकाशात झेपावले.

    यात जगातलं पहिले सिंगस पीस थ्री डी प्रिंटेड रॉकेट इंजिन वापरले गेले, जे देशातच बनवण्यात आले होते.

    अग्निलेट या देशातल्या पहिल्या सेमी क्रायोजेनिक इंजिनचा वापर यात करण्यात आला होता. इंधन म्हणून यात अती शीत ॲाक्सिजनचा वापर केला जातो.

  18. पाकिस्तानी माध्यमं भारताच्या निवडणुकीबद्दल काय म्हणतात? '2019 मध्ये पाकिस्तानने भाजपला जिंकण्यासाठी मदत केली', सविस्तर वाचा

  19. तोतरेपणा: लहान मुलांमधला तोतरेपणा कसा ओळखायचा, त्याच्यावर काय उपचार असतात?