ऑलिम्पिकचं स्वप्न राहिलं अधुरं म्हणून सायकलिंगचा वापर करत त्याने लुटल्या बँका

टॉम जस्टिस सायकल ट्रॅकवर उभा असताना.

फोटो स्रोत, Tom Justice

फोटो कॅप्शन, टॉम जस्टिस सायकल ट्रॅकवर उभा असताना.
Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

शिकागोमध्ये लिबर्टीविले इथं टॉम जस्टिसचं घर आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत सायकलिंग करण्याचं स्वप्न सोडून हा सायकलवरून बँक लुटायला लागला. त्याच्या चोरीच्या पेशाला त्याचं नाव शोभत ना, ना त्याचा पत्ता.

टॉम त्याच्या लहानपणी उत्साही सायकलस्वार होता. वयाच्या 13 व्या वर्षी जेव्हा त्याने त्याच्या भागातल्या अॅथलिट्सना सायकलींच्या शर्यतींसाठी असलेल्या रिंगणात सायकल चालवताना पाहिलं तेव्हा त्याला सायकलिंगचा नाद लागला.

त्या क्षणापासून टॉमने स्वत:ला सायकलिंग करण्यासाठी प्राणपणाने झोकून दिलं. कॉलेजमध्ये डिग्री घेतल्यावर तो यूएस ऑलिम्पिक ट्रॅक संघासोबत प्रशिक्षण घेण्यासाठी पुरेसा प्रशिक्षित झाला होता.

रिअ‍ॅलिटी बाईट्स

पण इथं एक गडबड झाली. टॉम कॉलेजमध्‍ये असताना ती सहा वर्षे त्याला चित्रपटांचं वेड लागलं. बेन स्टिलरच्‍या 1994 मध्ये आलेल्या रिअ‍ॅलिटी बाईट्स या चित्रपटाचा टॉम विशेष करून फॅन होता. इथन हॉकच्या ट्रॉय डायरच्या व्यक्तिरेखेने टॉमला वेड लावलं होत. चित्रपटातला ट्रॉय समाजामुळे भ्रमनिरास होऊन नोकरी सोडतो.

यावर टॉम म्हणतो, "मला वाटतं तो चित्रपट सारखा सारखा बघून दुर्दैवाने माझा दृष्टिकोनही तसाच झाला."

टॉमला ऑलिम्पियन बनणं अचानकच अति मेहनत असल्यासारखं वाटू लागलं. त्याने सायकलिंगचा नाद सोडला आणि तो आपल्या घरी शिकागोला परतला.

टॉमला त्याच्या आयुष्यात उत्साह आणि यश हवं होतं. मात्र त्याच्या अपेक्षेप्रमाणे तसं काही घडलंच नाही. आपलं ध्येय गाठण्यासाठी लागणारा संथ आणि स्थिर दृष्टिकोन त्याच्या आळशी मानसिकतेने नाकारला.

त्याऐवजी, यशाच्या शिखरावर जाण्यासाठी त्याला इतर चित्रपटांनी प्रेरणा दिली. चोरीवर आधारित एका क्लासिक 'हीट' नावाच्या सिनेमाने तो प्रभावित झाला. आणि यातूनचं टॉमने रुपेरी पडद्यावरील कल्पनारम्यतेपासून गुन्हेगारी वास्तवापर्यंत विचित्र झेप घेतली.

टॉम जस्टिस

फोटो स्रोत, Tom Justice

फोटो कॅप्शन, टॉम जस्टिस

बँकेवर घातलेला पहिला दरोडा

23 ऑक्टोबर 1998 रोजी त्याने पहिली बँक लुटली. ऑलिम्पिकला जाण्यासाठी त्याने सायकल रेसिंग जे कौशल्य मिळवलं होतं, त्याचाच वापर करून त्याने बँक लुटून वेगात धूम ठोकली.

एका वर्षानंतर त्याने आणखी एक दरोडा टाकला. आणि बघता बघता दुसरा आणि तिसरा. पण नेहमीचं नि:शस्त्र. दरोड्यात मिळालेल्या पैशांचा माग काढून आपण पकडले जाऊ शकतो या भीतीने टॉम ते पैसे डंपस्टरमध्ये फेकून द्यायचा किंवा मग तपकिरी कागदाच्या पिशव्यांमध्ये ते पैसे भरून गरीब वस्तीत सोडून द्यायचा.

एफबीआय तपास

पण चित्रपटासारखं आयुष्य जगताना खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या परिणामांना ही सामोरं जावं लागतं. तुमच्या अहंकार तुम्हाला सांगतो तुम्ही इतक्या बँका लुटू शकता. अगदी त्याचवेळी एफबीआय तुम्हाला शोधायला सुरुवात करते.

टॉम या गोष्टींपासून अनभिज्ञ होता आणि तेव्हाच एफबीआयने लुटलेल्या बँकांचे धागेदोरे जुळवायला सुरुवात केली.

एफबीआयने त्याला "द कॉयरबॉय" असं टोपणनाव देखील दिलं होत. ज्याप्रकारे तो धीरोदात्तपणे छातीसमोर हात धरायचा आणि बँकेचे अधिकारी त्याची बॅग डॉलरने भरायचे त्यावरूनच त्याला हे नाव दिलं होतं.

कोणतीही महत्त्वांकांक्षा नसलेल्या टॉमचं खरं रूप आता उलगडायला लागलं होतं. या सर्व गोष्टींमुळे तो त्याच्या कुटुंबाला निराश करेल याची त्याला सतत जाणीव होत होती.

टॉम जस्टिस आणि सायकल

फोटो स्रोत, Tom Justice

निराशा आणि असमानता

पण बँक लुटल्यामुळे त्याला निराशेतून आणि असुरक्षिततेतून क्षणिक दिलासा मिळाला."आपण जेव्हा आपल्या रोजच्या जीवनात वावरतो तेव्हा आपल्याकडे एक रहस्य असतं. माझं रहस्य म्हणजे मी माझ्या फावल्या वेळेत बँका लुटल्या होत्या."

"फक्त आणि फक्त तेच होतं. मी अट्टल चोर आहे ही वस्तुस्थिती नाकारण्यासाठी मला या गोष्टीचा आधार मिळाला होता."मात्र बँकेचं होत असलेलं नुकसान, बँकेतील कर्मचार्‍यांच्या चेहऱ्यावरील भीती किंवा त्याच्या गुन्ह्यांचे परिणाम याबद्दल टॉमने काहीच विचार केला नव्हता.

कोकेन आणि क्रॅक

दुहेरी आयुष्य जगून त्याने जे यश मिळवलं होतं, ते लवकरच संपण्याच्या मार्गावर होतं. त्याला आता ध्येयहीन झाल्यासारखं वाटू लागलं. याच दरम्यान तो एका पार्टीत गेला होता. तिथंच त्याची कोकेन या ड्रगची ओळख झाली.

ज्याप्रमाणे त्याने सराईतपणे बँका लुटून एक उच्चांक गाठला होता, त्याचप्रमाणे कोकेनच्या बाबतीत ही घडलं. टॉम आता त्याच्या लुटमारीचे पैसे ड्रग्जवर खर्च करायला लागला होता.

"मी यात का पडलो असेन हे मला आता वाटायला लागलं होतं. सगळ्या गोष्टी आता गटारात गेल्या होत्या. ड्रग्ज मिळविण्यासाठी जो व्यक्ती बँका लुटतो, पूर्णपणे स्वार्थी आहे असा मी एक सामान्य व्यक्ती ठरलो होतो."

नशीबाला उतरती कळा लागली होती

मार्च 2002 मध्ये जेव्हा टॉमने 26 वा बँक दरोडा टाकला तेव्हाचं टॉमच्या नशिबाला उतरती कळा लागली.

चोरीनंतर फरार होण्यासाठी टॉम सायकल वापरायचा.

फोटो स्रोत, Scott Crosby

फोटो कॅप्शन, चोरीनंतर फरार होण्यासाठी टॉम सायकल वापरायचा.

एका पोलिसाने त्याला ट्रॅफिकमध्ये सायकल चालवताना पाहिलं. त्या पोलिसाने त्याला हटकलं आणि त्याच्या बॅगेत काय आहे ते त्याला दाखवायला सांगितलं.

पोलिसांनी टॉमचा पाठलाग केला. त्याक्षणी टॉमने त्याच्या सायकलच्या पेडल्स जोरजोरात पाय मारायला सुरुवात केली आणि तिथून पळ काढला. त्या पोलीस कर्मचाऱ्याने बॅकअपसाठी वायरलेस रेडिओवर कॉल केला आणि टॉमचा पाठलाग सुरू झाला.

टॉम कसा तरी त्या रस्त्यांचा अडथळा पार करून सुटका करण्यात यशस्वी झाला. तिथून सटकण्याच्या नादात त्याला एका उंच उताराच्या तळाशी एक नदी दिसली.त्याने आपली सायकल एका बाजूला फेकली आणि दुसर्‍या बाजूने जाऊन पाण्यात उडी मारली. दाट झाडीत लपण्यासाठी आणखी खाली सरकला.

मग, त्याने वाट पाहिली. त्याच्या डोक्यावरून हेलिकॉप्टर जात होते, पोलिसांचे सायरन वाजत होते, त्याला पोलिस कुत्र्यांचे आवाजही ऐकू येत होते.

जेव्हा टॉम लपून बसला होता

टॉम तिथं बराच वेळ पडून होता. घबराट आणि गोंगाटाच्या वातावरणात त्याला विचार करायला थोडा वेळ मिळाला. "या गोष्टी माझ्यासाठी चांगल्या नाहीत याचा मी पहिल्यांदाच विचार करायला लागलो होतो. कारण पोलीस माझ्या मागे लागले होते."

"तसं का आहे? मी फक्त एका मनोरंजक वैयक्तिक सफरीवर आहे हे त्यांना दिसत नाहीये का? नाही, नक्कीच त्यांना ते दिसत नव्हतं."

"असं कधीच नव्हतं, पण जेव्हा मी ड्रग्स घ्यायला सुरुवात केली तेव्हा मात्र गोष्टी बदलल्या. आणि जेव्हा पोलिस तुमच्यावर गोळ्या झाडण्याच्या किंवा तुम्हाला अटक करण्याचा प्रयत्नात असतात, तेव्हा हा वेकअप कॉल असतो."

"मी वाईट मार्गावर हे मला हे पहिल्यांदाच समजतं होत. यातून बाहेर कसं पडायचं ते मला माहीत नव्हतं. खरंच मला माहित नव्हतं."

टॉम जस्टिस

सहा तासांच्या प्रतिक्षेनंतर तिथं शांतता पसरली. टॉम सावधपणे लपलेल्या जागेतून बाहेर पडला. त्या ओलसर जागेतून घसरून नदीच्या प्रवाहात आला. पण आता तो मुक्त होता.

कस्टम-बिल्ड सायकल ठरली पुरावा

टॉमची सायकल पोलीस घेऊन गेले होते. त्याची ती भगव्या रंगांची सायकल कस्टम-बिल्ड होती. त्यामुळेच ती पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही.

आता, पोलिसांकडे त्याची सायकल होती. त्यामुळे टॉमला कळून चुकलं होत की केव्हा ना केव्हा पोलीस त्याच्या घरापर्यंत येणारच.

काही महिन्यांनंतर टॉम जेव्हा त्याच्या आईवडिलांच्या घराच्या दिशेने निघाला होता तेव्हा त्याला त्याच्या गाडीच्या आरशात मागे उभी असलेली पोलिसांची व्हॅन दिसली.

मागे न बघता तो आता गाडी चालवायला लागला. एक सेकंदाचा अवकाश ती पोलिसांची गाडी त्याचा पाठलाग करायला लागली.

पोलिसांची धाड

टॉमने गाडीचा वेग कमी केला आणि आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तो कारमधून उतरला. मात्र सर्व बंदुका त्याच्या दिशेने रोखल्या होत्या.

यावेळी तो जमिनीवर मान खाली घालून पडला. हातकड्यांचा आवाज त्याने ऐकलाचं होता, तेवढ्यात त्या त्याच्या मनगटावर घट्ट चढवण्यात आल्या. आणि त्या क्षणाला त्याला वास्तवाची जाणीव झाली.

टॉमला पोलीस ठाण्यात नेऊन त्याची चौकशी करण्यात आली.त्याने सर्व काही कबूल केलं. मात्र आपल्या आईवडिलांचा फोन उचलून या अफवा खऱ्या आहेत आणि त्याला नुकतेच बँक लुटल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे हे सांगणं त्याच्यासाठी सर्वात अवघड होत.

"जी खूप लाजिरवाणी गोष्ट होती की आता त्यांनाच लोकांना सामोरं जावं लागणार होतं. आमचे शेजारी आणि मित्रमंडळी सगळ्या सगळ्यांनाच सामोरं जावं लागणार होतं. त्यांनी काही बोलावं अथवा न बोलावं पण त्यांना हे समजून घ्यावं लागणार होतं की त्यांच्या मुलाने काहीतरी भयानक गोष्टी केल्या आहेत."

"आणि त्यासाठी मला कमालीची लाज वाटली होती. मला आजही ते जाणवतं."

टॉम आणि त्याची प्रेयसी बारी

फोटो स्रोत, Tom Justice

फोटो कॅप्शन, टॉम आणि त्याची प्रेयसी बारी

कारावासाची शिक्षा

अमेरिकेच्या तीन राज्यांमधल्या 26 बँका लुटल्याप्रकरणी टॉमला 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. टॉमने गुन्हे केलेल्या चार वर्षात एकूण 129,338 यूएस डॉलर इतकी रक्कम चोरीला गेली होती.

तुरुंगात जाण्याबाबतीत ही त्याच्या विचित्र कल्पना होत्या, "ते खूप चांगलं असेल. शेवटी मी माझ्या विचारणसरणीच्या लोकांसोबत राहणार आहे." असं त्याला वाटत होतं."आणि जेव्हा मी तिथे पोहोचलो, तेव्हा मात्र तिथे असं काहीच नव्हतं."

टॉमला असं वाटायचं की तो वेगळा आहे. मात्र तिथं जाऊन टॉमला समजलं की अनेक लुटारुंनी गोळा लुटलेली रक्कम दिली होती.

"मला समजलं होतं की मी काही खास नव्हतो."

पीडितांचा प्रभाव

टॉमच्या अटकेनंतर त्याला जाणवलं की, त्याच्या वागण्याचा इतरांवर वाईट परिणाम झालाय.

पीडित लोकांनी दिलेले स्टेटमेंट वाचून तो निराशेच्या गर्तेत बुडाला. त्याने टाकलेल्या दरोड्यांचा लोकांवर मानसिक आघात झाला होता. बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जीवाची भीती होती.

"मला याची खरोखरच लाज वाटली. मला अपराधीपणाची जाणीव झाली. मी कधी त्यांची बाजू विचारातच घेतली नव्हती."

"पीडितांवर काय परिणाम होईल... हे वाचेपर्यंत मला याची जाणीवचं झाली नव्हती."आपल्या कृत्यांचा जो परिणाम झाला होता त्याचा विचार करणं तो थांबवू शकत नव्हता.

टॉम जस्टिस

फोटो स्रोत, Tom Justice

मग तो हार्ड ड्रग्सकडे वळला. आणि दिवसागणिक त्याची ही सवय वाढलीच. मजेमजेत केलेली गोष्टीने आता भयंकर रूप धारण केलं होतं."मला माहित नाही कसं पण मी बँका लुटायला सुरुवात केली होती."

मजेमजेत केलेल्या या गोष्टी नंतर भयंकर होत गेल्या. मजेसाठी तुम्ही बँका लुटू शकत नाही. 2011 साली तुरुंगातून सुटल्यानंतर टॉम त्याची मैत्रिण बारीला पुन्हा भेटला.

आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याचं श्रेय टॉम तुरुंगाला देतो."मी तुरुंगात मोठा झालो... त्यामुळे काहीही असो, जे घडलं ते योग्यचं घडलं. आणि त्यासाठी मी कृतज्ञ आहे." तो सांगतो.

(हा लेख बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसवर आउटलुकच्या लाइव्ह लेस ऑर्डिनरी बीबीसी साउंड्स पॉडकास्टसाठी लिहिण्यात आला आहे.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)