युक्रेनविरुद्ध युद्धनीती बदलण्याचा रशियाचा निर्णय नियोजनानुसार की अपयशामुळे?

सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, पॉल अॅडम्स
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाने एका महिन्यानंतर आता युद्धनीती बदलण्याचा निर्णय घेतला आहे का? रशियाचा युक्रेनबाबत वेगळा विचार सुरू आहे का?

हे सांगणं आता घाईचं ठरेल, पण रशियाच्या धोरणात काही बदल तर नक्कीच झाला आहे.

रशियन स्टाफ प्रमुख जनरल सर्गेई रूडस्कोय यांनी म्हटलं, "राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सूचनेप्रमाणे रशियन सैन्याच्या मोहिमेचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. रशियन सैन्य आता डोनबासच्या मुक्तीवर संपूर्ण लक्ष देईल. याचा अर्थ संवाद पुढे नेण्यासाठी हा एक प्रयत्न मानला जात आहे.

कारण युक्रेनच्या पूर्व भागात दोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रांतात आधीपासूनच रशिया समर्थक फुटीरवादी संघटनांचं वर्चस्व आहे. इतर भागावर वर्चस्व मिळवण्याचे रशियाचे प्रयत्न कमी पडताना दिसत आहेत.

राजधानी कीव्हवर कब्जा करण्याचा मनसुबा घेऊन दाखल झालेल्या रशियन सैनिकांच्या हाती अद्याप फारसं काही लागलेलं नाही. आणखी नुकसान टाळण्यासाठी त्यांनाच बचावात्मक पवित्रा घ्यावं लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर रशियन लष्करातील वरीष्ठ अधिकारी सर्गेई रुडस्कोय यांच्या बोलण्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं.

रशियाने आता राजधानी कीव्हचा ताबा मिळवण्याचे सगळे प्रयत्न सोडून दिले का, हा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.

व्लादिमीर पुतीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्लादिमीर पुतीन

शुक्रवारी (25 मार्च) रशियाचा एक वरिष्ठ अधिकारी युद्धादरम्यान ठार झाल्याचं सांगितलं जातं. रशियाकडून लढताना मृत्यूमुखी पडलेला हा सातवा मोठा अधिकारी आहे.

यानंतर आता रशियन जनरल रुडस्कोय यांच्या घोषणेमुळे रशियन युद्धनीती आणि महत्त्वाकांक्षा बदलल्याचं चित्र निर्माण झालंय, असं म्हटलं जात आहे.

एका अधिकाऱ्यांच्या मते, "रशियाला आता कळून चुकलं आहे की, ते एकाच वेळी विविध आघाड्यांवर आपली मोहीम राबवू शकत नाहीत. ते सध्या 10 नव्या बटालियन तयार करून डोनबासकडे जात आहे."

गेल्या महिन्यात युद्ध सुरू होण्यापूर्वी रशिया युक्रेनच्या सर्वोत्तम लढाऊ पथकांना घेरण्याचा प्रयत्न करेल, असं म्हटलं जात होतं.

मागे हटण्याचा अर्थ वेगळाही असू शकतो

नव्याने आक्रमण करण्याच्या विचाराने रशियन सैनिकांनी दोनेत्स्क आणि लुहान्स्कमधील नव्या भागाकडे कूच करत आहेत.

शक्यतो खारकिव्ह आणि इजियमकडून दक्षिण बाजूस जाण्याचा त्यांचा विचार असू शकतो.

वोलोदिमीर झेलेंस्की

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वोलोदिमीर झेलेंस्की

अखेरीस जर रशिया आझोव्ह सागराजवळ मारियापोल बंदरावर कब्जा मिळवण्यात यशस्वी ठरला तर ते उत्तर दिशेने पुढे जाऊ शकतात.

यामधील काही गोष्टी अजूनही अशक्यप्राय आहेत. मारियोपोलमधील युक्रेनियन सैनिक क्रूर प्रतिकार करत आहेत. या स्थितीत रशियन सैनिकांच्या हालचालींवर लक्ष असणार आहे.

पण दुसरीकडे, रशियन अधिकाऱ्यांनी म्हटल्यानुसार केवळ एका गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करायचं त्यांनी ठरवलं असेल. ही रणनिती ते नेमकी कशी वापरतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते खरंच आपल्या महत्त्वाकांक्षा सोडून देतील का, हासुद्धा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.

युक्रेनियन सैन्य प्रचंड शिस्तबद्ध आणि प्रेरित आहे. त्यामुळे तेसुद्धा प्रतिकाराची लढाई पूर्ण क्षमतेने लढतील. अशा स्थितीत दोन्ही बाजूंच्या डावपेचांकडे सर्वांचं लक्ष असेल.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)