रॉजर फेडरर युद्धाचा फटका बसलेल्या लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

फोटो स्रोत, PETER LAZAR
युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसला आहे. युक्रेनची स्थिती दर्शवणारे फोटो जगभरात पोहोचत आहेत. युक्रेनची स्थिती पाहून महान टेनिसपटू रॉजर फेडररने तिथल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
"युक्रेनमधल्या युद्धाची भीषण स्थिती पाहून मी आणि माझे घरचे अतिशय व्यथित झालो. युद्धाचा फटका बसलेल्या निरपराध लोकांची अवस्था पाहून मला गलबलून आलं. आम्ही शांततेचे पुरस्कर्ते आहोत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
युक्रेनमधल्या लहान मुलांची आम्ही जबाबदारी घेऊ. आम्ही त्यांना मदत करू. युक्रेनमधली 6 दशलक्ष मुलं युद्धामुळे शाळेबाहेर गेली आहेत. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं ही काळाची गरज आहे. युद्धाच्या कटू अनुभवातून बाहेर पडण्यासाठी तसंच त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही पाठिंबा देऊ.
रॉजर फेडरर फाऊंडेशन 'वॉर चाईल्ड हॉलंड' या स्वयंसेवी संस्थेला 500000 डॉलर्स रकम देणार आहे. युक्रेनमधल्या मुलांचं शिक्षण सुरू राहावं यासाठी ही संस्था काम करत आहे", असं रॉजर फेडररने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)