रशियाने युक्रेनच्या मारिओपोल शहराला कसा वेढा दिलाय?

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेनमध्ये पश्चिमेकडील शहर लविव्ह येथे विमानतळापासून सहा किलोमिटर अंतरावर भीषण दाट धूर दिसून येत आहे, असं बीबीसीचे करस्पॉडंट जोनाह फिशर यांनी सांगितलं. त्या सध्या लविव्ह शहरात आहेत.
शहराजवळ स्फोटाचा आवाज आल्याचं सांगत युक्रेनमधील काही अधिकाऱ्यांनी सतर्क केलं आहे.
पुष्टी न केलेल्या एका रिपोर्टनुसार, लविव्ह शहरातील विमानतळावर हल्ला करण्यात आल्याचे समजते. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात रशियाकडून हल्ले सुरू आहेत पण यात युक्रेनमधील पश्चिमेकडील मोठा भाग वाचला आहे.

युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्याचं सीरिया, चेचन्या आणि अफगाणिस्तानात झालेल्या युद्धापेक्षाही अधिक नुकसान झालं आहे असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला आहे.
दरम्यान रशियाने युक्रेनच्या शहरांवर हल्ले सुरू ठेवले आहेत. युक्रेनमधील मारिओपोल शहर आता जणू दु:खाच प्रतीक बनलं आहे. इथले लोक उपाशी आहेत आणि गारठले आहेत.
स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं, दक्षिणेकडील या बंदराचा 90 टक्के भाग आता उद्ध्वस्त झाला आहे. इथे असलेलं पांढऱ्या रंगाचं सिनेमागृहसुद्धा कोसळलं आहे.
काही जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. सिनेमागृहाच्या भूमिगत बंकरमध्ये काही जणांनी आसरा घेतला, यामुळे शेकडो लोक वाचले. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
काहीजण शहरातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आहे. स्वितलाना सांगते, "गॅस, पाणी आणि वीज नसताना मी बाहेर अन्न शिजवत आहे. कपड्यांचे अनेक थर घेऊन झोपलं लागतं. रात्रभर गोळीबार सुरू असतो. आम्हाला कॉरिडोअरमध्ये जमिनीवर झोपावं लागतं."
जवळपास 30 हजार नागरिक बाहेर पडण्यात यशस्वी झाले आहेत. परंतु अजूनही 3 लाख 50 हजार लोक अडकले आहेत.
मारिओपोल महत्त्वाचं आहे कारण ते युक्रेनच्या अशा सागरी पट्ट्याजवळ दोन क्षेत्रांमध्ये आहे जे आधीच रशियाच्या ताब्यात आहे. युक्रेनियन संरक्षण सल्लागार सांगतात, आणखी भयानक काहीतरी होणं बाकी आहे याची भीती आहे.
चेर्निहिवमध्ये एकावेळी 53 जणांचा मृत्यू?

फोटो स्रोत, Anadolu Agency
युक्रेनचे उत्तरेकडील शहर चेर्निहिवच्या महापौरांनी दावा केला आहे की, 16 मार्चला रशियाच्या सैनिकांनी 53 लोकांना ठार केलं.
महापौर व्याचेसलव कौस यांनी मेसेजिंग अॅप टेलिग्रामवरुन सांगितलं, "सतत हल्ले सुरू आहेत. ते लोकांचं सर्वकाही उद्ध्वस्त करत आहेत."
"रशियाच्या हल्ल्यांमुळे आमचं मोठं नुकसान होत आहे. एका दिवसात आम्ही 53 लोकांचे मृतदेह पाठवले आहेत."
रशियाचा गोळीबार ज्याठिकाणी सतत सुरू आहे अशा भागांत स्थानिक प्रशासन वीज, पाणी आणि गॅस पुरवठा देण्याचा प्रयत्न करत आहेत.
दलवीर भंडारी यांनी रशियाविरोधात केलेलं मतदान
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मार्चला सांगितलं की, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाचे न्यायाधीश आपलं वैयक्तिक मतदान करू शकतात. भारतीय न्यायाधीश न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयात रशियाविरुद्ध मतदान केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बुधवारी (मार्च) आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने (आयसीजे) रशियाला युक्रेनमध्ये आक्रमकता थांबवण्यासाठी संगितलं होतं. युक्रेनच्या मागणीनंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हा आदेश दिला होता. 13 न्यायाधीशांनी न्यायालयाच्या या आदेशाचं समर्थन केलं तर दोन न्यायाधीशांनी विरोधात मतदान केलं.
रशियाच्या समर्थनार्थ न्यायालयाचे उपाध्यक्ष आणि रशियाचे न्यायाधीश किरील जीवॉर्जियन आणि चीनचे न्यायाधीश हानकिन यांनी मत नोंदवलं.
भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांनी रशियाविरुद्ध आपलं मतदान केलं.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, "त्यांनी वैयक्तिक अधिकारात मतदान केलं आहे आणि याच आधारावर मतदान केलं जातं. आयसीजेमध्ये न्यायाधीशांच्या मतदानावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही."
"ते एक भारतीय नागरिक आहेत पण ते आयसीजेचे सदस्य असून वैयक्तिक मतदान करू शकतात. आयसीजेसमोर आलेल्या विषयांर न्यायाधीश कशा प्रकारे मतदान करतात यावर मी भाष्य करणार नाही,"

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























