रशियाचे निम्मे सोने आणि परकीय चलनसाठा जप्त

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, HAZEM BADER/AFP VIA GETTY IMAGES)

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

पाश्चात्य निर्बंधांतर्गत आता रशियाच्या सोने आणि परकीय चलनसाठयाच्या जवळपास निम्मा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे रशियाला आता चीनकडून मदतीची अपेक्षा आहे.

रशियाने रविवारी सांगितलं आहे की, रशियावर लावलेल्या पाश्चात्य निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणीतून सावरण्यासाठी रशियाला चीनच्या मदतीची अपेक्षा आहे.

रशियाचं म्हणणं आहे की, "निर्बंधांमुळे त्यांचे जवळपास निम्मे सोने आणि परकीय चलनसाठा गोठवण्यात आला आहे."

रशियाचे परराष्ट्र मंत्री एंतोव सिलुआनोव म्हणाले, "रशियाकडे असणाऱ्या सोने आणि परकीय चलनाचा एक भाग चीनी चलनात उपलब्ध (युआनमध्ये) आहे. त्यामुळे चीन आणि रशियाच्या परस्पर व्यापारावर मर्यादा आणण्यासाठी पाश्चात्य देश कोणता दबाव आणतात ते आता पाहावं लागेल. अर्थात, त्या व्यापारावर रोख लावण्यासाठीचं दबाव आणला जात आहे."

ते पुढे असं ही म्हणाले की, "चीनसोबतच्या आमच्या भागीदारीमुळे दोन्ही देशांमध्ये असलेले हे सहकार्य आम्ही पुढे ही कायम राखू असा आम्हाला विश्वास आहे. तसेच जिथे पाश्चिमात्य बाजारपेठा बंद पडत आहेत अशा वातावरणात आम्ही नक्कीच टिकाव धरू."

रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पाश्चात्य राष्ट्रांनी रशियाच्या कॉर्पोरेट आणि वित्तीय प्रणालींवर निर्बंध लादले. मात्र रशियाने युक्रेनवरील या हल्ल्याला 'विशेष लष्करी कारवाई' असं म्हंटल आहे.

अलीकडच्या काळात मानवाधिकार आणि इतर अन्य मुद्दे लक्षात घेऊन पाश्चात्य राष्ट्रांनी चीन आणि रशियावर दबाव वाढवला आहे. असं असताना हे दोन्ही देश एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत.

4 फेब्रुवारी रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बीजिंग इथे बैठक झाली होती.

युक्रेनच्या लव्हिवमध्ये भीषण स्फोटाचे आवाज

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्ध अद्याप सुरू आहे. आज युक्रेनच्या पश्चिमेस असलेल्या लव्हिव शहरात भीषण स्फोटांचे आवाज ऐकायला आल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीच्या युक्रेनी सेवेला सांगितलं.

यूएनआयएन वृत्त सेवेनेही सोशल मीडियावरील युजर्सच्या माध्यमातून म्हटलंय की, लविव शहरात दोन मोठ्या स्फोटांचा आवाज ऐकायला मिळाला.

युक्रेन

फोटो स्रोत, DANIEL LEAL/AFP via Getty Images

स्थानिक माध्यमांच्या वृत्तांनुसार, लविवसह युक्रेनमधील अनेक भागात रात्रभर हवाई हल्ल्यांच्या सायरनचा आवाज ऐकायला येत होता.

कीव्ह इंडिपेंडंटनुसार, "लविवमध्ये रशियन मिसाईलने हल्ले होत आहेत."

बीबीसी प्रत्यक्षदर्शींच्या दाव्याला दुजोरा देत नाहीय.

युक्रेन, रशिया

फोटो स्रोत, DANIEL LEAL/AFP via Getty Images

पश्चिम युक्रेनच्या लव्हिव शहरात सध्या परदेशी माध्यमांचे अनेक प्रतिनिधी आहेत. त्याचसोबत, युक्रेनमधून बाहेर जाणारे लोकही लव्हिव शहरामार्गेच पुढे जात आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

प्रत्यक्षदर्शींनी बीबीसी युक्रेनी सेवेला सांगितलं की, पश्चिमेकडील इव्हानो-फ्रेंकिव्स्कमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.

युक्रेनी मीडियाही लव्हिवमध्ये हल्ल्याचे वृत्त देत आहे.

लष्करी प्रशिक्षणाच्या मैदानावर हल्ला

बीबीसी युक्रेनी सेवेनुसार, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लव्हिव शहरात असलेल्या युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रशियानं इथं हवाई हल्ले केले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, रशियानं इथल्या इंटरनॅशनल पीसकीपिंग अँड सिक्युरिटी सेंटरवर आठ मिसाईलने हल्ले केले.

हे केंद्र लव्हिव शहरापासून जवळपास 30 किलोमीटर दूर यावोरिवमध्ये आहेत आणि इथं लष्कराचं प्रशिक्षण मैदान आहे.

इथल्या आभाळात धुराचे लोट दिसून येतात, इतकी काय हल्ल्यांची तीव्रता होती.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)