रशिया युक्रेन वाद : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर्स

Servicemen of the Ukrainian National Guard take positions in central Kyiv

फोटो स्रोत, Reuters

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

रशियाने युक्रेनवर 'आक्रमण' केल्यानंतर जागतिक स्तरावर सातत्याने वेगाने घडामोडी घडत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 24 फेब्रुवारीला युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केलीय.

युक्रेनमध्ये सध्या अनेक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक अडकले आहेत. त्यांच्या मदतीसाठी भारत सरकारनं हेल्पलाईन नंबर्स प्रसिद्ध केले आहेत.

युक्रेनमधील भारतीयांच्या मदतीसाठी हेल्पलाईन

भारतीय परराष्ट्र मंत्रालय कंट्रोल रूम, नवी दिल्ली1800118797 (Toll-free)

+91 11 23012113

+91 11 23014104

+91 11 23017905

फॅक्स: +91 11 23088124

ईमेल: situationroom@mea.gov.in.......युक्रेनमधील भारतीय दूतावास (24*7 hrs)

+380 997300428

+380 997300483

ईमेल: cons1.kyiv@mea.gov.in

वेबसाईट: www.eoiukraine.gov.in

रशिया-युक्रेन वाद

युक्रेनमध्ये सुमारे 20 हजार भारतीय नागरिक आहेत. परिस्थितीशी निपटण्यासाठी भारताची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान आवश्यक ते निर्णय घेण्यात येत आहेत, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी काल (24 फेब्रुवारी) दिली.

युक्रेनमध्ये घडामोडी वेगाने घडत आहेत. या परिस्थितीशी निपटण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. तिथं राहत असलेल्या भारतीयांची नोंद घेण्याचं काम सध्या सुरू आहे. हे काम एका महिन्यापूर्वीच सुरू करण्यात आलं होतं.

ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय राहात असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांत 4 हजार भारतीयांना युक्रेन सोडलं आहे.

दिल्ली येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात 980 कॉल आणि 850 ई-मेल प्राप्त झाले आहेत. पुढील दिवसांतही युक्रेनमधील भारताचं काम सुरू राहील, असं श्रृंगला यांनी सांगितलं.

शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी संकटात सापडले आहेत. त्याबद्दल तुम्ही इथं अधिक वाचू शकता - रशिया-युक्रेन युद्धात अडकलेली 8 मराठी मुलं म्हणतात, 'आमच्याकडे 4 दिवसांचंच रेशन'

राजधानी कीव्हमध्ये रशियन सैन्य पोहोचलं

रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये पोहोचल्याचाी माहिती युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं दिलीय.

कीव्ह शहरात रशियन सैन्य पोहोचल्याची माहिती देतनाच, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं नागिरकांना आव्हान केलंय की, "काळजी घ्या, घरातून बाहेर पडू नका."

कीव्हस्थित बीबीसीच्या प्रतिनिधींनी काही वेळापूर्वी गोळीबाराचा आवाजही कीव्ह शहरात ऐकला. शिवाय, गोळीबाराच्या आवाजानंतर स्फोटाचा मोठा आवाज आल्याचंही त्यांनी सांगितलं.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता युक्रेनची राजधानी कीव्हमधून नागरिकांनी बाहेर पडायला सुरुवात केली आहे.

दरम्यान रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवला आहे. 1986 मध्ये घडलेल्या आपत्तीनंतर आजपर्यंत याठिकाणी किरणोत्सर्ग कायम असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं या परिसरातील संघर्षामुळं आंतरराष्ट्रीय आण्विक घडामोडींवर लक्ष ठेऊन असलेल्या संस्थांनी काळजी व्यक्त केली आहे.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)